निलंगा एसटी महामंडळाच्या वाहकाचे आंदोलन

 निलंगा  एसटी महामंडळाच्या वाहकाचे आंदोलन







निलंगा: येथील एसटी महामंडळाच्या  वाहक  यांनी आज ETIM मशीन मिळवण्यासाठी उपोषणाला बसले आहे गेल्या अनेक दिवसापासून ETIM मशीन मिळावी यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज  वाहकांनी निलंगा बसस्थानकासमोर उपोषणाला बसले असून विविध मागण्यासाठी हे उपोषण करण्यात येत असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली 


निलंगा आगारात मशीनचा तुटवडा आहे व वाहकांना मॅन्युअल ट्रे वर कामगिरी करावी लागत आहे. त्यामुळे सर्व वाहक कर्मचारी वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच कर्मचारी यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे, व पर्यायाने एसटी महामंडळाचे ही आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत आहे, मशीनचा वापर न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. अपंग व्यक्तीचे वन फोर ची सवलत नोंद होत नसल्यामुळे 75 टक्के आर्थिक नुकसान होत आहे, बरेच जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्डच्या सवलतीचा वापर करीत आहेत मशीन नसल्यामुळे सदर किलोमीटरवर 50 टक्के सवलत बुडत चालली आहे, तसेच सरकारी पत्रकार स्वतंत्र सैनिक दलित मित्र अशा अनेक सवलती धारक जे स्मार्ट कार्डचा वापर करतात त्यांची नोंद होत नसल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोरोनामुळे मॅन्युअल ट्रे  वापरल्यामुळे जोड तिकिटे एकमेकांस जोडून द्यावे लागतात व सुरक्षेसाठी हॅन्ड ग्लोज घातल्यामुळे तिकीट फाडता येत नाही किंवा ते कमीअधिक जाण्याचा संभाव्य धोका आहे. त्यामुळे ती पाहण्यासाठी बोटांचा वापर करीत असताना तोंडाचा संपर्क येतो त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो पर्यायाने प्रवासी वर्गाचा जीव धोक्यात घाढण्याचा आपला कोणताही नैतिक आधार नसल्याचेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहेत. यावेळी अनेक वाहक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या