युवकांनी समाज उपयोगी कार्य करावे -- उपनिरीक्षक सिध्देश्वर गोरे
उस्मानाबाद :- ( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी )
सध्या देशासमोर कोरोना आजाराचे मोठे संकट उभे टाकले आहे. कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा या महासंकटात लोकांत जनजागृती होणे गरजेचे आहे. अशावेळी युवकांची भूमिका महत्वाची असून युवकांनी समाजउपयोगी कार्य करण्याचे आवाहन उमरगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सिध्देश्वर गोरे यांनी व्यक्त केले. दाळींब येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त देवदूत सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपन, सॅनिटाइझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. रोटरीचे माजी सचिव प्रा. युसुफ मुल्ला, सामजिक कार्यकर्ते गोविंद चव्हाण, मिलीन सुरवसे, देवु राठोड, देवु पवार, देवदूत सामजिक संस्थेच्या सचिव सौ.संगीता चव्हाण, सुलोचना कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 100 वृक्षे लावण्यात आले. गावातील नागरीकांना सँनिटायझर, मास्क व आर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप करण्यात आले. सचिन पवार, गोपीचंद चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, आमोल राठोड, देवानंद राठोड, उमेश राठोड, अशोक राठोड, धनराज पवार, विकास राठोड, अनिल पवार, सुधाकर चव्हाण, सुनील राठोड, गुलाब चव्हाण, अशोक चव्हाण, बब्रुवान राठोड यांच्यासह देवदूत सामजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.