आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर पुन्हा दुकानाची वेळ बदलावी लागेल- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
उस्मानाबाद: ( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आस्थापना उघड्या ठेवण्याची वेळ पाच वाजेपर्यंत करण्यात आली आहे. मात्र उस्मानाबाद शहरात या आदेशाच पालन होत नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे आली होती अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली व पाच वाजल्यानंतर आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले नागरिकांनी गर्दी करू नये ३ वाजता बंद होणारी बाजारपेठेची वेळ दोन तास वाढवून ९ ते ५ वाजेपर्यंत करण्यात आली होती. मात्र ५ वाजल्यानंतर ही लोक गर्दी करत असतील तर पुन्हा पाहिले निर्णय म्हणजेच मार्केटची वेळ ३ वाजेपर्यंत करावी लागेल असा इशाराच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसार माध्यमांना बोलताना दिला आहे.
दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर व्यापाऱ्यांची वाढती मागणी पाहता ५ वाजेपर्यंत बाजारपेठ उघडी करत सामान्य व्यापारी वर्गाला दिलासादिला होता.तसेच आता कारवाई करण्याची वेळ येऊ न देता लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.