*परंडा-भूम-वाशी तालुक्यातील रमाई आवास योजनेतील घरकुलांना तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा -शाबीर शेख
*समाजातील दुर्बल घटकांसाठी असलेल्या योजनांच्या अमलबजावणीसाठी मनसे आग्रही..
उस्मानाबाद ( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) जिल्ह्यातील परंडा-भूम-वाशी या तालुक्यांमध्ये अनुसूचित जाती तसेच नौबोद्ध समाजातील अति-दुर्बल घटकांसाठी असलेल्या रमाई आवास योजनेतून २०१९-२० या कालावधीमध्ये परंडा,भूम,वाशी या तालुक्यांसाठी अनुक्रमे ६८१,१११४,७०३ घरकुलांचे उद्दिष्ट असतांना,घरकुल मंजूर होऊन ६ महिन्यांचा अवधी उलटला असतांना ही फक्त निधी नसल्याने समाजातील दुर्बल घटकांना या योजनेचा फायदा घेता आला नाही तरी जिल्हाधिकारी यांनी स्वतः या विषयात लक्ष घालून या वंचितांना लवकर लाभ मिळावा म्हणून रमाई आवास योजनेतील घरकुलांना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आज मनसेचे जिल्हा उप-अध्यक्ष शाबीर भाई शेख यांनी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,उस्मानाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी उस्मानाबाद चे जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी गपाट साहेब,उप-जिल्हा अध्यक्ष शाबीर भाई शेख,शेतकरी सेनेचे विश्वनाथ पाटील,स्वप्नील पाटील तसेच परंडा-भूम-वाशी येथील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.