प्रधानमंत्री आवास योजनेतील थकित हप्ते मिळावे यासाठी नगर परिषदे समोर धरणे आंदोलन

 प्रधानमंत्री आवास योजनेतील थकित हप्ते मिळावे यासाठी नगर परिषदे समोर धरणे आंदोलन








औसा मुख्तार मणियार

 औसा शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील ११६  लाभार्थ्यांना थकित तीस-या हफ्त्याचा निधी व १२९ पात्र लाभार्थ्यांना पहेला हप्त्याचा निधी त्वरीत मिळावे यासाठी 8 सप्टेंबर 2020 मंगळवार रोजी औसा येथील सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला यांनी औशाच्या वतीने नगर पालिके समोर धरणे आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात नगर पालिके मार्फत औसा शहरातील एकूण 245 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजना मंजूर झाली आहे त्यापैकी फक्त 116 लाभार्थ्यांना दोन हप्त्यात एकूण एक लाख रुपये प्राप्त झाले आहे या रकमेतून 116 कुटुंबांनी स्वतःचे राहते कच्चे घर पाडून बांधकाम चालू केले आहेत व ते बांधकाम अर्धवट स्वरूपात असून त्याची पुढच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम न मिळाल्याने मागील सात-आठ महिन्यांपासून थांबले आहेत व काही लोकांनी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे आणून बांधकाम पूर्ण केले आहेत तरी या त्रस्त असलेल्या लाभार्थींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते खूनमीर मुल्ला यांनी नगर पालिके समोर 8 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी या आंदोलनात.सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला, राजेंद्र बाबु जाधव, शेख जावेद नजीर,सय्यद फैय्याज,अजीतं सुरज पांडे, अशोक पवार,जमावोद्दीन अब्बास सौदागर आदि उपस्थित होते.यावेळी आंदोलन करत्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या