उस्मानाबाद जिल्हयात 1 ते 31 ऑक्टोबर 2020 कालावधीत लॉकडाऊन राहणार-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

 उस्मानाबाद जिल्हयात 1 ते 31 ऑक्टोबर 2020 कालावधीत लॉकडाऊन राहणार-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर





         उस्मानाबाद,दि.01( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) :-महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविड-19 उपायोजना नियम-2020 प्रसिध्द केले असुन यातील नियम क्र.3 नुसार करोना विषाणूमुळे (COVID-19)  उध्दवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.


         महाराष्ट्र शासनाने कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.


       जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद संदर्भ क्र. 2 अन्वये व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 01 ऑक्टोबर 2020 पासून ते 31 ऑक्टोबर 2020 रोजीचे 24.00 वाजे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवित आहे.


       उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनचे कालावधीत गृह विलगीकरण (Home Quarantine) च्या नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीविरोधात दंडात्मक कारवाई करणेबाबतचे आदेश संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. तसेच गैरकृत्यांबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. लॉकडाऊनचे कालावधीत संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात या आदेशासोबत दिलेल्या परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेल्या कोविड-19 च्या व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच या आदेशासोबतच्या परिशिष्ट 2 मध्ये नमूद केलेल्या ज्या बाबींना चालू ठेवण्यास वेळोवेळी परवानगी देण्यात आलेली आहे. त्या सर्व बाबी 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत पूर्वीप्रमाणे चालू ठेवण्यास परवानगी राहील. तसेच या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश या आदेशासोबत दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यत लागू राहतील.


      याआदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.


    याआदेशाची अंमलबजावणी दिनांक 01ऑक्टोंबर-2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावाकर यांनी निर्देशित केले आहे.


  परिशिष्ट-1


कोविड-19 चे व्यवस्थानासंदर्भात राष्ट्रीय सूचना


1. चेहरा झाकणे:- सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवासादरम्यान नागरिकांनी तोंडावर मास्क/स्वच्छ रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे.


2. सामाजिक अंतराचे पालन:- सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींनी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फूट (2 गज की दूरी) ठेवावे. आस्थापना/दुकाने यांनी एका वेळी 5 पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात/आस्थापनेत उपस्थित राहणार नाहीत तसेच ग्राहकांमध्ये शारिरिक अंतर राहील. याबाबत दक्षता घेणे आवश्यक राहील.


3. मेळावे:-मोठे सार्वजनिक मेळावे/समारंभ यांच्यावरील निर्बध कायम राहतील.


विवाहासंबंधीत मेळाव्यांमध्ये/समारंभांमध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही.अंत्यविधीच्या/अंत्ययात्रेच्या कार्यक्रमांमध्ये 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही.


4. सार्वजनिक ठिकाणी थुकल्यास राज्य शासन/स्थानिक प्रशासनाकडून कायदे व नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.


5. सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, गुटखा, तंबाखू इ. तत्सम पदार्थांचे सेवन करण्यास परवानगी असणार नाही.


कामाच्या ठिकाणांबाबत अधिकच्या सूचना:-


6. घरुनच काम करणे (वर्क फ्रॉम होम):- शक्य असेल तेथपर्यंत घरुनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) या पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. कार्यालये, कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक व वाणिज्य आस्थापनांचे ठिकाणी काम/व्यवसायाच्या तासांची सुनियोजितपणे आखणी करणे आवश्यक राहील.


7. तपासणी व स्वच्छता (Screening and hygiene):- सर्व प्रवेश व निर्गमनाचे ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग करणे, पुरेश्या प्रमाणात हॅण्डवॉश व सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील.


 8. वारंवार निर्जतुकीकरण:- कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारी संपूर्ण जागा, सार्वजनिक सुविधा आणि मानवी संपर्कात येणा-या सर्व जागा उदा. दरवाजाचे हॅण्डल इ. दोन्ही पाळ्यांच्या दरम्यानच्या कालावधीत करावयाच्या स्वच्छतेसह वारंवार निर्जतुक होईल,याबाबत दक्षता घ्यावी.


9. सामाजिक अंतराचे पालन:- कामांच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होण्यासाठी कामगारांमध्ये पुरेसे अंतर, दोन शिफ्टमध्ये पुरेसा अवधी ठेवण्यात यावा. तसेच कर्मचा-यांचे दुपारच्या जेवणाचे वेळी इ. ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होईल याबाबत दक्षता घ्यावी.


परिशिष्ट 2


(महाराष्ट्र शासन, महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, अधिसूचना क्र. DMU/2020/CR.92/DISM-1 दि. 30 सप्टेंबर 2020.)


1. CONTAINMENT ZONE मध्ये करावयाची कार्यवाही:-


उस्मानाबाद जिल्ह्यात ज्या ठिकाणी करोना रुग्ण आढळून येईल त्याठिकाणी CONTAINMENT ZONE जाहीर करण्याचे अधिकार संबंधित उपविभागाचे INCIDENT COMMANDER म्हणून उपविभागीय अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्राकरिता राहतील. संबंधित उपविभागीय अधिकारी हे केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व निर्देशनुसार CONTAINMENT ZONE चे क्षेत्र, कालावधी व त्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्या बाबी चालू राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत वेगळा आदेश काढून त्याबाबत सर्वांना सूचित करतील. CONTAINMENT ZONE बाबत राज्य शासनाचे दि. 19 मे 2020 व दि. 21. मे 2020 मधील सूचना लागू राहतील.


2. खालील बार्बीना जिल्ह्यामध्ये प्रतिबंध कायम राहील


1) शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व कोचिंग क्लासेस इ. संस्था 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत बंद राहतील. ऑनलाईन/दूरस्थ शिक्षण पद्धतीला परवानगी चालू राहील. तसेच या पद्धतीस प्रोत्साहन देण्यात यावे.


2) सिनेमागृह, जलतरण तलाव, मनोजन केंद्रे, चित्रपटगृहे (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्सेसमध्ये असलेल्या चित्रपटगृहांसह), कलाकेंद्रे, सभागृहे आणि तत्सम ठिकाणे बंद राहतील.


3) भारत सरकारच्या गृह विभागाने परवानगी दिलेल्या बार्बी व्यतिरिक्त अन्य बार्बीकरिता आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करण्यास प्रवाशांना परवानगी असणार नाही.


4) मेट्रो रेल्वे सेवा.


5) सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम व इतर सभा संमेलने व मोठे मेळावे यांना प्रतिबंध राहील.


 6) महाराष्ट्र शासनाने व या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार धार्मिक ठिकाणे व प्रार्थनास्थळे महाराष्ट्र शासनाचे पुढील आदेशापर्यंत जनतेसाठी बंद राहतील.


7) महाराष्ट्र शासनाने व या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार


व्यायामशाळा महाराष्ट्र शासनाचे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.


3. सर्व अत्यावश्यक वस्तूंची (किराणा, दूध, भाजीपाला, फळे इ. जिवनावश्यक वस्तूंची दुकाने) दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. मेडीकल, औषधी दुकाने 24 तास चालू ठेवण्यास परवानगी राहील.


4. खालील नमूद केलेल्या बाबींना परवानगी राहील.


1. सर्व अत्यावश्यक (जिवनावश्यक) नसलेल्या वस्तूंची दुकाने वेळोवेळी शासनाने व या कार्यालयाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार खालीलप्रमाणे चालू ठेवण्यास परवानगी राहील.


a) सर्व अत्यावश्यक (जिवनावश्यक) नसलेल्या वस्तूंचे मार्केट/दुकाने ही सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत उघडी राहतील. तथापि, कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतराचे (Social Distancing) निकष पाळले गेले नाही अथवा गर्दी केल्यास सदरचे मार्केट/दुकाने शासकीय यंत्रणेकडून तात्काळ बंद करण्यात येतील.


b) उस्मानाबाद जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल पंप सकाळी 8 ते सायंकाळी 7 या वेळेत चालू राहतील. तथापि उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप दररोज 24 तास (24x7) चालू राहील.


c)उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पेट्रोल पंप दररोज  दररोज 24 तास (24 x 7) चालू राहतील.


d)उस्मानाबाद जिल्हयातील बेकरी व स्वीट मार्ट दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजे चालू राहतील. तसेच सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत घरपोच सेवा (होम डिलीव्हरी) देण्यास परवानगी राहील.


e) संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात बी बियाणे व खते या कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकाने/आस्थापना,बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगीक बियाणे पॅकींग, हाताळणी केंद्र, बीज परिक्षण प्रयोगशाळा, कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटे भाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत चालू राहतील.


f) उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहतील.


 g) रेस्टॉरन्ट्स मध्ये फक्त स्वयंपायकगृह चालु ठेवुन अन्न पदार्थाची घरपोच सेवा (होम डिलीव्हरी) देण्यास सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत परवानगी राहील. मात्र ग्राहकांना प्रत्यक्ष रेस्टॉरन्ट्स मध्ये बसून जेवण घेणेकरिता सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतच परवानगी राहील. (याकरिता खालील नमूद


संदर्भ मुद्दा क्र. 5 वाचावा.)


h) उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील व राज्य महामार्गावरील धाबे दररोज 24 तास (24 x 7) चालू राहतील.


i) पान, तंबाखू इ. पदार्थाची दुकाने बंद राहतील.


j) मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील फुड कोर्ट/रेस्टॉरंट्स फक्त त्यांना घरपोच सेवा पुरविण्यासाठी सुरु ठेवता येतील. मात्र कोविड-19 चा प्रादुर्भाव पसरु नये यासाठीच्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करुन दिलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीचे त्यांनी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.


k) उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोविड-19 च्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे अनुषंगाने नागरिकांनी सायंकाळी 07.00 नंतर चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे अनुषंगाने नागरिकांनी सायंकाळी 07.00 नंतर वैद्यकीय तातडीची निकड वगळता इतर कारणासाठी घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे. तसेच दर रविवारी जनता कयूं राहील. त्याचे पालन करावे.


5. हॉटेल्स/फुड कोर्ट्रस/रेस्टॉरंट्स व बार यांना दि. 5 ऑक्टोबर 2020 पासून 50 टक्के क्षमतेने चालविण्यास परवानगी राहील. सदर आस्थापना चालविताना घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत पर्यटन विभागाकडून स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (SOP) जारी करण्यात येईल. त्या प्रमाणित कार्यपद्धती (SOP) चे पालन करणे सदर आस्थापनांना बंधनकारक असेल.


6. ऑक्सीजन सिलेंडर्सची वाहतूक करणा-या वाहनांना वेळेच्या कोणत्याही निर्बधाशिवाय जिल्ह्यात मुक्त वाहतुकीची परवानगी असेल. संबंधित सक्षम प्राधिकरण/विभागांनी जिल्ह्यात ऑक्सीजन वाहतूक करणा-या वाहनांची मुक्त हालचाल होईल तसेच ऑक्सीजन सिलेंडर्सचे उत्पादक व पुरवठादार यांच्यावर कोणतेही निबंध लादले जाणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी.


 7. कोविङ-19 चे अनुषंगाने राज्य शासन व केंद्र शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले नियम, अटी व शर्ती, प्रमाणके यांच्या अधीन राहून उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रवासाची सुरुवात व शेवट करणा-या रेल्वे सुरु करण्यास परवानगी राहील.


8. राज्य शासनाचे व या कार्यलयाचे अन्य कोणत्याही विशिष्ट/सर्वसाधारण आदेशानुसार परवानगी दिलेल्या बाबी परवानगी आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्तीसह चालू राहतील.


9.संपूर्ण जिल्हयामध्ये ज्या बाबींना प्रतिबंध घालण्यात आलेला आहे.त्या बाबींवरील निर्बंध शिथिल करणे व त्या बाबी चालू करणे याबाबत राज्य शासनाकडून प्राप्त होणा-या कार्यपध्दती (SOP) मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे आदेशात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या