अध्ययन अध्यापन आहवाल संकलन पत्र रद्द करुन शिक्षकांचा सन्मान राखावा* आ नागो गाणार ( महाराष्र्ट राज्यशिक्षक परीषदेची मागणी )

 *अध्ययन अध्यापन आहवाल संकलन पत्र रद्द करुन शिक्षकांचा सन्मान राखावा*   आ नागो गाणार 

( महाराष्र्ट राज्यशिक्षक परीषदेची मागणी )


लातूर ( प्रतिनिधी )

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक माध्यमिक उच्चमाध्यमिक विद्यालयातील आँनलाईन व आँफलाईन अध्ययन अध्यापनअहवाल संकलन करण्याचे पत्र रद्द करण्यात यावे  अशी मागणी  प्रशासनाकडे महाराष्र्ट राज्य शिक्षक परिषद आमदार नागो गाणार यांनी केली आहे .

*महाराष्र्टातील शिक्षक कोरोना कोवीड   प्रार्दुभाव काळात  शासनास मदत करत आहे कोरोना ड्युटी साठी शिक्षकांच्या सेवा अधिगृहीत केल्या आहेत. शिक्षण विभाग या अधिगृहीत सेवातुन कार्यमुक्त करण्यास अपयशी ठरले आहे* . *शिक्षकाना मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य वाटप करण्याचे काम होते . विविध सर्वेक्षणाचे काम शिक्षकवृंद करत आहे*

  *तरीही   प्रत्येक शाळेतील शिक्षक विद्यार्थी शिक्षणापासुन दूर राहु नये यासाठी आँनलाईन आॅफलाईन अध्यापनाचे कार्य करत आहे   मे महिन्यापासुन शिक्षक अध्यापन कार्य करत आहे गृहभेटी घेवुन शिक्षण देण्याचे कार्य सुरु आहे* . हे अभिनंदनीय आहे याची दखल घ्यायला पाहिजे  पण अध्ययन अध्यापनाची साप्ताहीक  माहीती आँनलाईन भरण्याची जबाबदारी शिक्षकांवर दीली आहे. *शिक्षकांचा सन्मान विचारात न घेता मालकी थाटाचा  वापर करुन  अशैक्षणीक कामे शिक्षकावर लादली आहेत ही अत्यंत खेदाची बाब आहे* .  शासकीय योजना कागदोपत्री राबवणे साठी शिक्षकाचा बळी दिला जात आहे  तरी वरील विषयी  सर्व राज्यातील विविध व्यवस्थापनाच्या सर्व  माध्यमांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक  विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय यामधील शिक्षकांच्या साप्ताहीक आँनलाईन आँफलाईन  *अध्ययन संकलन करण्याचे पत्र रद्द घोषित करुन शिक्षकांचा सन्मान राखावा* 

अशी मागणी महाराष्र्ट राज्यशिक्षक परिषदेचे आ नागो गाणार यानी केली आहे  लातूर जिल्हातील सर्व पदाधिकारी व शिक्षक सभासद  शिवकुमार मुरगे प्रा. मधुकर कुलकर्णी  शेळगावकर बंडू अपसंगीकर प्रकाश कुलकर्णी मालिकार्जून पेद्दे विजय साबदे राजाभाऊ खंदाडे दयानंद बनापुरे राम जोशी वेणुनाथ यादव सुधिर बिराजदार मदन कराड श्रीधर लोहारे हनुमंत केंद्रे तालवाडे सर तातेराव मुंढे अतुल गुरमे दत्ता गुणले राजु सुडे विजय नळेगावकर प्रदीप गाडे युवराज माने अनिल पवार शाशंक चिमनशेट्टे  गोविंद शाश्त्री बालाजी घुम्मे अमृतेश्वर स्वामी नेताजी चोहान प्रल्हाद डोंगरे महिला आघाडी च्या आशाताई रोडगे तृप्ती पंडित रेखा सुडे सविता धर्माधिकारी रजनी जोशी तोळण देशमुख वनिता काळे रेणुका गिरी निजवंते देवर्षी मॅडम पाटील मॅडम आदीनी  वरील मागणीस पांठीबा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या