आता ट्रॅफिक पोलिसांच्या हातात दिसणार अत्याधुनिक बॅटन लातूर महापालिकेकडून वाहतूक शाखेला सुरक्षा साहित्याचे वितरण

आता ट्रॅफिक पोलिसांच्या हातात दिसणार अत्याधुनिक बॅटन 

लातूर महापालिकेकडून वाहतूक शाखेला सुरक्षा साहित्याचे वितरण 

लातूर /प्रतिनिधी :शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे आणि सामान्य नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी महानगरपलिका प्रयत्नशील आहे. वाहतूक नियंत्रणाचे काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहर वाहतूक शाखेला साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुढील पाच वर्ष पुरेल एवढे साहित्य पालिकेने दिले असून यामुळे वाहतूक पोलीस अधिक सहजतेने नियंत्रणाचे काम करू शकणार आहेत.
   लातूर शहराची लोकसंख्या वाढत असताना वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे वाहतूककोंडी होऊ शकते. त्यावर नियंत्रण करण्यासाठी महापालिका आणि शहर वाहतूक पोलीस प्रयत्न करतात. वाहतूक नियंत्रणासाठी आणि शिस्त लावण्यासाठी साहित्याची गरज असते. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीने वाहतूक शाखेला आधुनिक पद्धतीचे साहित्य देण्यात आले. यात १८५ फायबर बोलार्ड, ३० अत्याधुनिक बॅटन, उच्च प्रतीच्या २० टॉर्च,२५२किलोग्रॅम लोखंडी साखळ्या आणि अडीच हजार फूट दोरखंड याचा समावेश आहे. 
  आज महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,शहर पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे, माजी उपमहापौर देविदास काळे, नगरसेवक रघुनाथ मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत हे साहित्य वाहतूक शाखेला सुपूर्द करण्यात आले. आगामी पाच वर्षात लातूर शहराची वाढणारी लोकसंख्या व त्या अनुषंगाने वाढणारी वाहनांची संख्या गृहीत धरून हे साहित्य पुरवण्यात आले आहे. या साहित्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होणार असून वाहतूक नियंत्रण सोपे होणार असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी यावेळी बोलताना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या