*सडक परिवहन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे हार्दिक अभिनंदन.*
*लातूर - टेंभुर्णी महामार्गाच्या दुरुस्तीकरिता १६६ कोटी मंजूर.*
{ जिल्हा प्रतिनिधी }
लातुर : दि. ३० - लातूर - येडशी - बार्शी - कुर्डवाडी - टेंभुर्णी हा राष्ट्रीय महामार्ग पुणे, मुंबई, प्रवासासाठी दळणवळण करण्याकरिता अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे. परंतु या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे हे अत्यंत जिकिरीचे होऊन गेले होते. या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होण्याचेही प्रमाण वाढले होते. तसेच अपघात होऊन जीवित हानी पण झालेली आहे. पुणे आणि मुंबई जाणारे बरेच वाहन चालक या रस्त्यावरुन प्रवास करताना होणारा त्रास टाळण्यासाठी लातूर येथून औसा - तुळजापूर - सोलापूर यामार्गे पुणे - मुंबई प्रवास करत असत.
केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांनी लातूर ते टेंभुर्णी या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता १६६ कोटी रुपये निधी मंजूर केल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे हार्दिक अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत. हा निधी मिळाल्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होऊन वाहतुकी करिता व दळणवळणासाठी वाहनचालकांना व प्रवाशांना अत्यंत सोयीचे होणार असल्याचे मत व्यंकटराव पनाळे यांनी व्यक्त केले आहे. लातूर टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीमुळे नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यातील जनतेमध्ये आनंद निर्माण झाला असल्याची भावना व्यंकटराव पनाळे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे व्यक्त केली आहे.
याबरोबरच कोरोनावर मात करून पूर्णपणे बरे होऊन आल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छाही व्यंकटराव पनाळे यांनी दिल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.