*उत्तर प्रदेशातील बलात्कार प्रकरणातील मोकाट फिरत असलेल्या आरोपीस फाशी द्या*
--------------------------------------------
*बलात्कार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीसावर अट्रोसिटी दाखल करण्यात यावी*
भिम आर्मी ची मागणी
----------------------------------- - --
लातुर:-५ अक्टोबर वार सोमवार
लातुर ;- प्रतिनिधी
लातुर येथे हाथरस येथील पीडित मुलीवर झालेल्या बलात्काराचा निषेध नोंदवत दिनांक १ अक्टोबर रोजी भिम आर्मी सह सदरील घटनेचा जाहीर निषेध नोंदवत
कँडल मार्च काडून श्रद्धांजली वाहिली
आज दिनांक पाच अक्टोबर रोजी
जिल्हाधिकारी कार्यालय लातूर याचे द्वारा मा महामहिम राष्ट्रपती याना दिलेली निवेदनाद्वारे मागणी
उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केलेल्या घटनेचा तीव्रपणे निषेध नोंदवत व सदरील घटनेतील आरोपीस तात्काळ अटक करून ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा नोंदवून योग्य ती कार्यवाही करणे बाबत ,
, उत्तर प्रदेश मधील भुल्पडी गाव, चंद्रप्पा पोलीस स्टेशन, जिल्हा हतरस येथील 19 वर्ष वयाच्या दलित मुलगी मनीषा वाल्मिकी या मुलीवर शेतामध्ये काम करीत असताना याच गावातील सवर्ण जातीच्या चार तरुण युवकांनी दि.२४/९/२०२० रोजी जबरदस्ती सामूहिक बलात्कार करून तिचा गळा आवळून मान दाबून व इतर अवयवांचे हाडे मोडून जबरदस्त जखमी केले अशावेळी पीडित मुलगी आढावा ओरड केल्यानंतर सदरील आरोपी जागेवरून पळून गेले यासंदर्भात पीडित मुलीच्या आईवडिलांनी पोलिसांशी संपर्क साधून दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले,
काही दिवसांनी उपचारादरम्यान मुलीत मुलींचा मृत्यू झाला तरीही या प्रकरणी पोलिस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल न घेता आरोपीस बचावाचे भूमिका आरोपी संरक्षण दिले गेले व पीडित कुटुंबीयांना धमकी दिली गेली, व सदर पीडित मृतदेहांची कुटुंबास न कळवता परस्पर रात्रीच्या सुमारास दहन करण्यात आले या बलात्कार व हत्या प्रकरणातील गूढ रहस्य वाढले आहे,
एकीकडे केंद्र सरकार च्या ,
" बेटी बचाव बेटी पढाव" या मुंबई मोहीमेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत अशाप्रकारे मुलींवर सामूहिक अत्याचार करून त्यांना मारले जाते तर मुलांना शिकवायचे कसे ?
सदरील या घटनेबद्दल मोकाट फिरत असलेल्या नराधम आरोपीस व हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासन व पोलीस प्रशासन यांना तात्काळ अटक करून ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करावा व हा खटला जलदगती न्यायालयात दाखल करावा अशी मागणी भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे मराठवाडा संघटक विनोद कोल्हे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे जिल्हा सचिव बबलू शिंदे शहर अध्यक्ष बाबा ढगे शहर महासचिव बबलू गवळे शहर उपाध्यक्ष आकाश आदमाने रेणापूर तालुका संघटक कार्तिक गायकवाड पवन गायकवाड अनेक कार्यकर्त्यानी निवेदनाद्वारे राष्ट्रपती यांच्या कडे मागणी केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.