*कैवल्य फास्ट फुड* हॉटेलचे सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते उद्घाटन.
लातुर : दि. ५ - ( प्रतिनिधी) लातूर शहरातील पाच नंबर चौकात २ ऑक्टोंबर वार शुक्रवार रोजी सायंकाळी ७ वाजता *कैवल्य फास्ट फूड* या शुद्ध शाकाहारी हॉटेलचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उत्तमराव दबडगावकर यांच्या हस्ते व्यंकटराव पनाळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच हॉटेलचे संचालक मिलिंद दबडगावकर आणि किरण लोंढे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप मोहिते, संतोष पनाळे यांचा गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
हॉटेल च्या उद्घाटनप्रसंगी ग्राहक हेच दैवत समजून सेवा करावी असे सांगून हॉटेल चे संचालक मिलिंद दबडगावकर आणि किरण लोंढे यांना व्यंकटराव पनाळे यांनी हॉटेल व्यवसायाकरिता शुभेच्छा दिल्या.
या कैवल्य फास्ट फूड च्या उद्घाटन कार्यक्रमास मंगेश लुल्ले, जांभळे, गोविंद कोमटवाड, चंदन पनाळे, परमेश्वर बंडगर, विशाल पाटील, शंकर वाघमारे, सतीश मस्के पाटील, सुरज चव्हाण, इस्माईल शेख, प्रीतम कांबळे, सतीश शिंदे, बसवराज पाटील, माने आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.