मनरेगा ग्राम विकासाच्या माध्यमातून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार
मनरेगा ग्राम विकास औसा मतदार संघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक व प्रशासक यांचे 13 ऑक्टोंबर 2020 मंगळवार रोजी विजय मंगल कार्यालय औसा येथे क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने आ. अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद चे अध्यक्ष राहुल केंद्रे होते तर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी अभिमन्यू पवार यांनी मनरेगातून ग्रामविकासाचा नवा पॅटर्न औसा विधानसभा मतदारसंघातून निर्माण करू असा विश्वास औसा येथील कार्यशाळेत व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिनव गोयल, प्रमोद झींगाडे, एम एस कोंढाळकर, शरद आडगळे यांचे यावेळी मार्गदर्शन झाले. यावेळी या मनरेगा'विकासाच्या कार्यक्रमात श्रीराम पाटील, सुहास पाचपुते, आबा लोखंडे, उपजिल्हाधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, गट विश्वास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, एडवोकेट अरुण कुलकर्णी, संतोष पप्पा मुक्ता, काकासाहेब मोरे, महेश पाटील, ज्ञानेश्वर वाकडे, दीपक चाबुकस्वार, लहू कांबळे,अॅड अरविंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.