विविध विकास कामासंदर्भात बैठक संपन्न... बैठक : जिल्हाधिकारी व आमदारांची उपस्थिती..

 विविध विकास कामासंदर्भात बैठक संपन्न... 

बैठक : जिल्हाधिकारी व  आमदारांची उपस्थिती.. 





एस ए काझी / मुख़्तार मणियार 



औसा प्रतिनिधी /-रोजगार हमी योजना व मनरेगा अंतर्गत विविध विकास कामासंदर्भात बैठक लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस औशाचे आमदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी, अभियंता उपस्थित होते. या बैठकीत रोजगार हमी योजना व मनरेगा अंतर्गत येणाऱ्या सर्व कामांना प्राधान्य देण्यात आले.

नरेगा अंतर्गत मजूरांच्या कामांचा कृती आराखड्याचे नियोजन करणे, या योजनेतील संपूर्ण कामे पूर्ण करून प्रलंबित कामे निकाली काढणे, या योजना अंतर्गत तालुक्यासह  शहराचा विकासावर भर दिला. शहराच्या विकास कामासाठी आराखडा तयार करून  विविध विकास कामांना महत्त्व देण्यात आले.


तालुक्यातील ग्रामीण भागासह, शहराचे विषय घेत, रोजगार हमी योजनेतून औसा शहरा लगतचा जोड रस्ता, अंतर्गत रस्ते  या योजनेतून शहरात होवू शकणारे इतर अनेक योजना संबंधी तसेच औसा शहरातील मुख्य रस्ता रुंदीकरणाचे तिसऱ्या टप्प्याचे काम व शहरा लगत क्रिडा संकुल उभारण्याच्या कामासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर हे स्वप्न  पुर्ण करण्यासाठी शहराचा विकास प्रभावीपणे राबविण्यासाठी औसा शहरासह संपूर्ण मतदारसंघात या योजनेतून विकास साधायचा प्रयत्न केला जाणार आहे. शहरा लगत च्या जोड रस्ता, व अंतर्गत रस्ते सह आदी अन्य कामांना प्राधान्य दिले आहे. यावेळी औशाचे आ. अभिमन्यू पवार, लातूर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, औशाचे तहसीलदार शोभा पुजारी, औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, औसा नगर पालिकेचे भाजपचे गटनेते तथा नगरसेवक सुनील उटगे, उन्मेष वागदरे, नगर अभियंता देशमुख यांच्या सह आदी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या