महामार्गाच्या निकृष्ट कामाची गडकरींकडे केली तक्रार !
औसा मुख्तार मणियार
आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा येथून जाणा-या महामार्गाची पाहणी करुन बोगस कामांची माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे
"केंद्रीय मंत्री गडकरी यांचा दावा ठरला खोटा" या मथळ्याखाली २९ सप्टेंबर रोजी औसा तालुक्यातुन जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाची पोलखोल केली होती. त्याची गंभीर औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी घेत राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर पडलेल्या भेगा आणि अन्य कामाची पाहणी केली.
जाग्यावरूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून या रस्त्याची संबंधित कंत्राटदार यांनी केलेल्या दुर्दशेची माहिती दिली. तसेच गडकरी यांना एक पत्र लिहून या विषयाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
औसा तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी ते वारंगा फाटा ३६१ आणि तुळजापूर मोड ते उमरगा जाणाऱ्या ५४८ (ब) या दोन्ही महामार्गाचे काम नुकतेच झाले आहे. ५४८ (ब) मार्गाचे काम अद्यापी सुरू असले तरी ३६१ चे काम होऊन वर्ष झाले. औसा ते उजनी या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेले पाणी बाहेर पडण्याची कुठलीच व्यवस्था दिलीप बिडकॉन या कंपनीने केली. नेहमी या भागात अपघात घडत आहेत. याबाबत अनेक तक्रारीही आमदारांकडे आल्या. करोडो रुपये टोलच्या माध्यमातून लाटणाऱ्या कंत्राटदारांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे समोर आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.