औश्याच्या जनावर बाजारास अद्याप प्रतिसाद नाही कोरोना विषाणू चा परिणाम
औसा.प्रतिनिधी
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जनावरांचा जंगी बाजार आरोग्य सेतू अॅप नियमाचे पालन करून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या प्रमाणे दिनांक 1ऑक्टोबर रोजी जनावरांच्या बाजारास लाॕकडाऊन नंतर सुरवात झाली. दिनांक 8ऑक्टोबर रोजीचा दुसरा बाजार भरविण्यात आला, परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनावरांच्या या बाजारात अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद नाही. सध्या शेतातील सोयाबीन कापणी मळणी आणि रब्बीसाठी पेरणीपूर्व मशागतीत शेतकरी व्यस्त आहेत .तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुद्धा कमी झालेला नसल्यामुळे पशुपालक आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी धजावत नाहीत. 100 ते 125 जनावरे औसा बाजारात दिसून आली. त्यापैकी खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी झाल्याने केवळ 1० ते 12दाखले कृषी उत्पन्न बाजार समितीकडून फाडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली मागील काळात भिज पाऊस आणि सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची शेतीची कामे मागे पडल्याने शेतकरी सोयाबीन कापणी हंगामात गुंतल्याने जनावराच्या बाजारात पशुपालक आणि खरेदीदार व्यापाऱ्यांचा प्रतिसाद नाही .जनावरांच्या बाजारात औसा येथे मोठी उलाढाल होत असते परंतु कोरोनाच्या प्रादुर्भाव आणि शेतातील कामे यामुळे जनावर बाजारास अद्याप प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. मात्र औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात नवीन सोयाबीन पिकांची आवक वाढली असून 3000 ते 3700 रुपये प्रति क्विंटल भाव सोयाबीन पिकाला मिळत आहे.कोरोना विषाणूमुळे जनावरांच्या बाजारास मात्र फटका बसल्याचे दिसते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.