औसा- लातूर रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून आमदार अभिमन्यू पवार यांची आढावा बैठक संपन्न
औसा प्रतिनिधी.
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांना सोबत घेऊन औसा- लातूर रस्त्याची पाहणी दिनांक 9 ऑक्टोंबर 2020 शुक्रवार रोजी करून सदरील रस्त्याच्या कामासंदर्भात आमदार अभिमन्यु पवार यांनी शासकीय विश्रामगृह औसा येथे आढावा बैठक घेतली या बैठकीत औसा ते लातूर हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे अशा सूचनाही दिल्या, चौपदरीकरणाच्या कामासंदर्भात व प्रलंबित भुसंपादन कार्यवाही व मावेजा बाबत अहवाल अपीलीय अधिकारी यांच्याकडे तातडीने सादर करण्याचे निर्देशही या बैठकीत दिले आहेत.यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक, श्री सुनील पाटील, तहसीलदार शोभा पुजारी, ज्येष्ठ नेते सुशील दादा भाजपाई, संतोषप्पा मुक्ता, अडवोकेट अरविंद कुलकर्णी, सो जया ताई उटगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, नगरसेवक गोपाळ धानुरे, भाजप शहराध्यक्ष लहू कांबळे, प्राध्यापक शिवकुमार मुर्गे, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजकिरण साठे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय परसणे, अजित पाटील, विकास कटके, सागर अपूर्ण, मकरंद रामपुरे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.