दारुबंदी अधिकारी बारगजेनी प्रशासकीय इमारतीचे बेकायदेशीर बंद केलेले प्रवेशद्वाराचे गेट जनतेसाठी खुले करावे.
सामाजिक कार्यकर्ते
व्यंकटराव पनाळे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
लातुर : दि. १० - जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामधील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये शासकीय कार्यालयांच्या साठी जागा देण्यात आलेल्या आहेत. प्रशासकीय इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर जिल्हा दारूबंदी अधिकारी यांचे कार्यालयआहे.
दारूबंदी करायची सोडून या महाशयांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उजव्या बाजूचे प्रवेशद्वार गेट बंद करून चक्क दारूबंदी कार्यालयाचे गोडाऊनच बनवले आहे. जप्त केलेल्या मोटरसायकली आणून याठिकाणी उभ्या केलेल्या आहेत.
हे प्रवेशद्वार बंद केले असल्यामुळे या इमारतीमधील जिल्हा निबंधक कार्यालय, कोषागार कार्यालय येथे येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांची हेळसांड होत असल्यामुळे नागरिकांनी लोकाधिकारचे संपादक व्यंकटराव पनाळे यांच्याकडे हे गेट बंद झाले असल्याबाबतची अडचण मांडुन ते पूर्ववत सुरू करावे अशी मागणी केली. जिल्हा दारूबंदी अधिकारी गणेश बारगजे यांना या बंद केलेल्या दरवाजा बाबत चौकशी केली असता, आम्हाला काही माहिती नाही. हे गेट आम्ही बंद केलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागालाच विचारा अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. या बंद केलेल्या गेट बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिरुरे यांच्याशी पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी फोनवरून व प्रत्यक्ष भेटून चौकशी केली असता शिरूर यांनी हे गेट दारूबंदी अधिकाऱ्यांनीच बंद केले असून त्या कुलपाची चावी दारूबंदी आधिकार्याकडेच आहे असे सांगितले. तसेच गेट बंद करून ठेवलेली वाहने दारुबंदी अधिकाऱ्यांनीच ठेवलेले आहेत असे सांगितले.
सार्वजनिक प्रशासकीय इमारतीचे प्रवेशद्वार बेकायदेशीरपणे बंद करणाऱ्या दारूबंदी अधिकारी बारगजे यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही करून हे प्रवेशद्वार तात्काळ खुले करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.