संगीत परीक्षा केंद्रास मान्यता ;
परीक्षार्थींना आनंद
औसा प्रतिनिधी
औसा येथे गेली दहा वर्षांपासून माऊली प्रतिष्ठानच्या वतीने माऊली संगीत विद्यालय चालवले जाते.
विद्यालयात गायन, हार्मोनियम, तबला आणि पखवाज हे विषय शिकवले जातात. शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना परीक्षा देण्याची येथे आजपर्यंत सोय नसल्यामुळे विध्यार्थ्यांना परीक्षेसाठी परगावी जावे लागत असे.
माऊली विद्यालयाला यावर्षी 'अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळा' च्या वतीने परीक्षा केंद्राची मान्यता मिळाल्यामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
औसा येथे एकमेव संगीत परीक्षा केंद्र मिळाल्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध झाली आहे.
परीक्षा केंद्राची मान्यता दिल्यामुळे गांधर्व मंडळाला तालुक्यातील संगीत प्रेमींनी धन्यवाद दिले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.