ईद-ए-मिलाद निमित्ताने शहरात जाफर पटेल युवा मंच तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन.

 ईद-ए-मिलाद निमित्ताने शहरात जाफर पटेल युवा मंच तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन... 


एस ए काझी 


औसा प्रतिनिधी /- उद्या दि.1 नोव्हेंबर रविवार रोजी ईद- ए- मिलादुनब्बी निमित्ताने शहरातील कटघर  कटघर गल्ली शादीखाना येथे ठिक 10 : 00 ते 4 : 00 वाजण्याच्या दरम्यान  भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे जाफर पटेल युवा मंच च्या वतीने कळविण्यात आले आहे. सध्या कोरोना महामारीच्या संकटावर मात करत संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेत सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महामारीत रुग्णांना रक्ताचा तुटवडा होऊ नये याची जाणीव ठेवत ईद-ए-मिलादुन्नबी च्या निमित्ताने शहरातील जाफर पटेल युवा मंच च्या वतीने  दुसर्‍या वर्षातील हे यशस्वी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटक म्हणून श्रीशैल्य उटगे अध्यक्ष लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी, व शिबिराचे अध्यक्ष म्हणून औशाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, तर प्रमुख पाहुणे म्हणून अमर खानापुरे व संतोष सोमवंशी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरास प्रमुख उपस्थितीत तहसीलदार शोभा पुजारी, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, नगरसेवक मुजाहिद शेख सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे असे जाफर पटेल युवा मंच च्या वतीने सांगीतले आहे.. ईद-ए-मिलादुन्नबी च्या सणानिमित्ताने रक्तदान शिबिरास यशस्वी करण्यासाठी जाफर पटेल युवा मंच चे अध्यक्ष मुन्ना देशमुख, उपाध्यक्ष अॅड. फय्याज सय्यद, सचिव जाकेर पटेल, कोषाध्यक्ष मजर पटेल यांनी व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या