*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश समन्वयकपदी कृषी साधना वृत्तपत्राचे संपादक बाबासाहेब पावसे यांची निवड*
विशेष प्रतिनिधी लातुर
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश समन्वयकपदी कृषी साधना या वृत्तपत्राचे संपादक श्री बाबासाहेब यादवराव पावसे* यांची निवड करण्यात आली आहे.
बाबासाहेब पावसे गेल्या 20 वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून विविध पुरस्कारांने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र या संघाचे सरचिटणीस पदावर कार्यरत असून महाराष्ट्रातील सरपंचाच्या न्याय हक्कासाठी धाऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण होतेय.
बाबासाहेब पावसे संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, *राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे* यांच्या सुचनेनुसार संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, राज्य महिलाध्यक्षा सुजाता गुरव, राज्य महिला कार्याध्यक्षा सविता कुलकर्णी, मंत्रालय व विधीमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील, राज्य सरचिटणीस राजू जाधव, अशोक इंगवले, दशरथ अडसूळ, नवनाथ कापले, साईनाथ जाधव, शमशुद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे,व्यंकटराव पनाळे, विनायक सोळसे, जालिंदर शिंदे, सागर पनाड, एस.एच.पारखे, अजयभाऊ सुर्यंवंशी, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, युवा प्रदेश महिलाध्यक्षा किरण जाधव राज्य व सर्व जिल्हा कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे .
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !देण्यात आल्या आहे या निवडी बदल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.