*शेतकरी-कामगार विरोधी कायद्याचा निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन*
विशेष प्रतिनिधी ::-लक्ष्मण कांबळे
केंद्रातील भाजप सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयके व कामगार विरोधी विधेयके हुकूमशाही पद्धतीने मंजूर करून घेतल्यामुळे जनसामान्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे हे अन्यायकारक कायदे मागे घेण्यात यावीत, या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर शुक्रवार, दि.2 ऑक्टोबर रोजी *धरणे आंदोलन* करण्यात आले.तसेच शेतकरी यांच्या सह्याचा शुभारंभ ही करण्यात आला
*उस्मानाबाद येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील,* माजी मंत्री *मा.मधुकरराव चव्हाण* जिल्हाध्यक्ष *मा.धीरज पाटील* माजी अध्यक्ष *विश्वासराव शिंदे* यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करून *महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री* यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांनी शेतकरी व कामगार विरोधी कायदे अन्यायकारक असून केंद्र सरकारने सदरील कायदे रद्द करण्याची मागणी केली.
यावेळी निरीक्षक कल्याण दळे, जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण, जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, युवकचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, रोहित पडवळ, प्रशांत पाटील, जावेद काझी, ओबीसी विभागाचे धनंजय राऊत, मिलिंद गोवर्धन, असंघटित कामगार अध्यक्ष देवानंद येडके, Adv.राज कुलकर्णी, उस्मान कुरेशी, शहाजी मुंडे सर, हरिभाऊ शेळके, मूहिब शेख, अब्दुल लतीफ, सुरेंद्र पाटील, विधी विभागाचे अध्यक्ष Adv. विश्वजित शिंदे, Adv.गणपती कांबळे, Adv.राहुल लोखंडे, संजय गजधने, बालाजी बिदे, प्रेम सपकाळ, सचिन चव्हाण, समाधान घाटशिळे, भरत चव्हाण, इलियास खान, नितीन माने, प्रसन्न कथले, सौरव गायकवाड, अदनान सिद्दीकी सहभागी होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी *"शेतकरी-मजदूर बचाव,"* *"शेतकरी विरोधी कायदे रद्द करा,केंद्र सरकारचा निषेध असो* अश्या जोरदार घोषणा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.