उत्तर प्रदेश सरकार व मोदी सरकार बरखास्त करा* मनीषा वाल्मिकी च्या नराधमांना फाशी झालीच पहिजे

 *उत्तर  प्रदेश सरकार व मोदी सरकार बरखास्त करा*


मनीषा वाल्मिकी च्या नराधमांना

 फाशी झालीच पहिजे






*लातुर मधून भिम आर्मी सह अनेक सामाजिक संघटनेची एक मुखी मागणि*


लातुर प्रतिनिधी:-


*१ अक्टोबर रोजी  लातुर मध्ये मनीषा वाल्मिकी या बहिणीला न्याय मिळावा म्हणून लातुर  गांधी चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क लातुर  कँडल मार्च काढण्यात आला व  भावपुर्ण श्रद्धांजली  भिम आर्मी कडून  वाहण्यात अली *बहनोके  सन्मान मे मी आर्मी मैदान मे** *योगी और मोदी तानाशाही नाही चलेगी नाही चलेगी योगी सरकार मुर्दाबद मुर्दाबद  अशा घोषणा देत* *लातुर मध्ये योगी सरकारचा जाहीर निषध नोंदवत*

*हाथरस येथील अमानुष्य कृत्याचा*

*त्यांच्या या संपूर्ण कृतीचा लातुर  भिम आर्मी संघटना व अनेक सामाजिक संघटना कडून जाहीर निषेध करण्यात आला असून त्या पीडित मनीषा वाल्मिकी  *बहिणीवरअत्याचार करू जीभ कापून व पाठीच्या मणक्याचे हाड मोडून अत्याचार करणाऱ्या चारी नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी**, *हाथरस येथे डेड बॉडी ही आई-वडिलांना न देता प्रशासनाने स्वतःह तिचे अंत्यसंस्कार केले त्या स्थानिक  जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना त्वरित निलंबित करण्यात यावे व त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी.*

 *योगी सरकार आल्यापासून महिलांवर  होत असलेले अत्याचार व त्या ठिकाणी वाढलेली गुंडगिरी बघता उत्तर प्रदेश मधील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून त्या ठिकाणी महिलांची सुरक्षा धोक्यात आहे तसेच हाथरस ,शहांजापुरा आणि गोरखपुर मध्ये घडलेल्या घटना पासून संपूर्ण उत्तर प्रदेश राज्य हादरून गेले असल्याने त्या *योगी सरकारला त्वरित बरखास्त करा अशी एकमुखी मागणी  भिम आर्मी भारत एकता मिशन लातुर सह अनेक सामाजिक संघटने कडून मागणी करण्यात येत आहे **

*योगी सरकार च्या राज्यात महिला सुरक्षित नाही  म्हणून महीलाच्या सुरक्षेसाठी   स्वरक्षणासाठी शस्त्र  बाळगणे ही साध्या काळाची गरज  आहे असे भिम आर्मी चे महाराष्ट्र संघटक अक्षय धावरे यांनी  आपले मत व्यक्त केले व जिल्हा प्रमुख विलास चक्रे यांनी  योगी सरकारला महिलांचा  आदर   पूर्वक सन्मान करणे जमत नसले मूळे राजीनामा देऊन  मोकळे व्हावे म्हणाले व जो पर्यंत  मनीषा वाल्मिकी या बहिणीला न्याय मिळत नाही तो  पर्यंत भिम आर्मी शांत बसणार नाही  असे म्हणाले या वेळी जिल्हा संघटक मिलिंद ढगे जिल्हा सचिव बबलू शिंदे शहर अध्यक्ष बाबा ढगे शहर महा सचिव बबलू गवळे शहर उपाध्यक्ष आकाश आदमाणे शिवाजी लांडगे* *कार्तिक गायकवाड पावन गायकवाड विजय विजय चक्रे अजय टेंकाळे अमोल गेजगे किरण इंगळे ईश्वर काळे प्रशांत कदम राम कसबे आदर्श उपाध्ये *रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा युवराज धसवाडीकर* *आंबेडकरी चळवळीचे रधुनाथ बनसोडे रंजीत आचार्य कांचना वाघमारे विनोद कोल्हे *ऍड प्रदीपसिह गंगणे काँग्रेस अनुसूचित आघाडीचे सचिन गंगणे ताहेरभाई सौदागर कॉम्ब्रेड विशंभर भोसले प्रा प्रवीण कांबळे मराठा लिब्रेशन संघटनेचे भीमराव गडेकर अमोल शिंदे युथ वारीयर्स चे कश्यप सुरवसे अमित कांबळे आदी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हजर  होते*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या