औसा येथील पत्रकार विनोद जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस कर्मचारी दिलीप लोभे यांनी कवितेच्या माध्यमातून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 औसा  येथील पत्रकार विनोद जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस कर्मचारी दिलीप लोभे यांनी  कवितेच्या माध्यमातून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 





औसा प्रतिनिधी 

औसा येथील दैनिक लोकशासन चे पत्रकार व  मा, खा,तथा संपादक  डॉ, सुनील बळीराम गायकवाड यांचे निकटवर्तीय उपसंपादक विनोद जाधव यांचा वाढदिवस दि.3 आक्टोंबर शनीवार रोजी औसा येथील पोलीस कर्मचारी दिलीप लोभे यांच्या हस्ते केक कापून पुष्पहार घालून गुच्छ देऊन वाढदिवस करण्यात आले.यावेळी दैनिक लोकशासनचे प्रतिनिधी नितीन कांबळे,,दैनिक लोकवार्ता औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार, महेश शिंदे ,आदीनी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पोलीस कर्मचारी दिलीप लोभे यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाच्या शुभेच्छा कवितेच्या माध्यमातून

[विनोद जाधव पत्रकार तुम्ही

वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दिलीप लोभे पोलिस आम्ही!


कोरोनाने जीवन केलं पार

तरी वाढदिवसाला तुम्हाला कसं विसरू तुम्ही माझे मित्र सोबती यार

बातमीचे वृत्तपत्रात देता सार 

कोरोनामुळे लांबून देतो फुलांच्या शुभेच्छाचे हार!


पत्रकारीतेसोबत गुजरात प.बंगाल कन्याकुमारी पर्यंत केली समाजसेवा 

लोकांनी आम्हाला म्हटले जरी देवा

तुमचा पण वाटतो आम्हाला हेवा ! 


कोरोनाने वातावरण जरी केलं जाम

15 वर्षं सामाजिक संस्था / स्थानिक सरकार सोबत भूकंप सुनामी ढगफुटी आपत्ती काळात केलात काम ! 


2013 मधील केदारनाथ येथील महाप्रलय काळात 2 वर्ष केले सामाजिक कार्य

कोरोना काळात देखील पोलिस व इतरांना केलात सहकार्य!


मराठी बरोबर येतात 5 भाषा

त्यामुळे दिवसेंदिवस काम करण्याची तुमच्या कडून आशा

कोरोना पण त्यामुळे गुंडाळील लवकरच गाशा ! 


फुले नगर औसा येथे राहता

सर्वांचे काम तुम्ही पाहता

म्हणून तर तुमचा भरपूर वर्ग आहे चाहता! 


दैनिक लोकशासन तालुका प्रतिनिधी औसा

वाढदिवसाला स्वागत करतो दिवसा !


अशीच प्रगती रहा करत

चांगली बातमी ला धरत 

शुभेच्छा देतो परत!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या