योगिता सावंत हिने पटकावला राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
एस ए काझी
औसा प्रतिनिधी /-सध्याला कोरोनामुळे शाळा बंद पण शिक्षण सुरु अशी पद्धत सुरु आहे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी अनेक संस्था प्रयत्न करत आहेत बीड येथील विद्यावार्ता मॅगझीनच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते लातूर जिल्ह्यातील औसा येथील श्री मुक्तेश्वर विद्यालयाची योगिता नेताजी सावंत हिने राज्यात वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाने यश मिळवले आहे या स्पर्धेत १८९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे सदरिल स्पर्धा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आल्या होत्या २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्ताने यशस्वी स्पर्धकांची घोषणा करण्यात आली आहे. यात परिक्षकांचे ५० % तर युट्यूबवर लाईक्स व व्हूझ यावरून स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे योगिता सावंत हिने युट्यूबवरिल व्हिडीओ व गूगलवरून माहिती मिळवून यश संपादन केले आहे आज शाळा बंद जरी असल्या तरी देखील औश्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन माहिती मिळवून यश मिळवत आहेत हेच कोरोनाच्या महामारीत शाळा बंद व शिक्षण सुरु आहे या काळात सर्वत्र योगीता सावंतला मुख्याध्यापक शरणाप्पा जलसकरे सचिन मिटकरी, प्रा हरिभाऊ पाटील, लक्ष्मीकांत हावळे, विवेकानंद मुर्कें, बस्वराज नन्ना, अवधूत डोके, प्रशांत मिरकले यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी योगिता सावंतचे संस्थाध्यक्ष शिवलिंगप्पा औटी सचिव डॉ बसवराज पटणे, रविशंकरप्पा राचट्टे यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.