*हाथरस येथील बलात्कार करणाऱ्यां नराधमांना भिम आर्मीच्या हवाली करा*
_____________________________
【 भिम आर्मी जिला प्रमुख विलास चक्रे लातुर】
- ---------------------------------------
प्रतिनिधी:-लातुर
-----–- - -----------
उत्तरप्रदेश येथील हाथरस येथे दिनांक १४सप्टेंबर२०२० रोजी वाल्मिकी समाजातील १९ वर्षीय मुलीला तिच्या आईच्या समोर शेतातून उचलून घेऊन जाऊन त्या मुलीवर चार नराधमांनी पाशवी बलात्कार केला व ते नराधम एवढ्या वरच न थांबता त्यांनी त्या पीडित मुलींची जीभ कापले व पाठीच्या मणक्याचे हाड मोडले व माणेवर घाव घातला एवढे नीच कृत्य करून त्या मुलीला ते चार नराधम तिला तिथेच सोडून पळून गेले त्या पीडित मुलीला दिल्ली येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला या घटनेची वार्ता उत्तरप्रदेशा सह अनेक राज्यात वाऱ्यासारखी पसरली तेंव्हा तेथील पोलीस प्रशासन ने त्या मुलीचा मृतदेह तिच्या आई वडिलांच्या ताब्यात न देता जबरदस्तीने तिचा अंत्यविधी उरकला पशु व हैवणाला ही लाजवेल असे कृत्य भाजपाच्या उत्तर प्रदेश मध्ये माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे.
भाजपच्या काळात बलात्काराच्या घटनांचा पेव फुटला असून यांच्या काळात महिला सुरक्षीत नसून जात व धर्म पाहून न्याय दिला जात आहे.
दिवसागणिक महिलांवर दिवसेंदिवस अत्याचाराचे प्रमाण वाढत असून .या या सर्व गोष्टींला सरकारच जबाबदार नसून पोलीस प्रशासन ही तितकेच जबाबदार आहे 【.देशातील महिला सुरक्षित राहण्यासाठी महिलांना स्वरक्षणासाठी त्यांना शास्त्र बाळगण्याची मुभा असावी जेणेकरून त्यांच्यावर जर असा प्रसंग येण्याचा अंदाज आल्यावर शस्त्र असल्या मुळे किमान त्यांची इज्जत राखता येईल म्हणून महिलांना शस्त्र बाळगणे ही काळाची गरज आहे.】
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.