एसबीआय ग्रामसेवा कार्यक्रमाचा हस्तांतरण कार्यक्रम संपन्न* विशेष प्रतिनिधी लातुर:-लक्ष्मण कांबळे

 *एसबीआय ग्रामसेवा कार्यक्रमाचा हस्तांतरण कार्यक्रम संपन्न*  


विशेष प्रतिनिधी लातुर:-लक्ष्मण कांबळे





     *औसा* :-  तालुक्यातील गांजनखेडा व तपसे चिंचोली ग्रामपंचायत अंतर्गत तपसे चिंचोली , गाढवेवाडी , गाढवेवाडी तांडा व लालवाडी  येथे एसबीआय फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या समन्वयातून ग्रामसेवा कार्यक्रम ऑक्टोबर 2017 ते सप्टेंबर 2020 या तीन वर्षात राबविण्यात आला.  या कार्यक्रमांतर्गत या पाच गावात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, विद्युतीकरण, शुद्ध पाणीपुरवठा,  उपजिविका विकास, स्वच्छतेची विविध विकासात्मक कामे करण्यात आली.  या कामाच्या हस्तांतरण कार्यक्रम 2 ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून हस्तांतर ग्रामपंचायतीला करण्यात आले. 

     यावेळी गंजनखेडा येथे एसबीआय बँक, लातूरचे चीफ मॅनेजर श्री. कसबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे एस.बी. आय. बँक (LDB)लातूर चे व्यवस्थापक कुलकर्णी सर  व भारतीय स्टेट बँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था लातूरचे  संचालक रवींद्र इबुतवार  सर, एस. बी. बँक शाखा किल्लारीचे व्यवस्थापक साबळे साहेब , दिलासाचे बापू कदम, गोंसाई , गांजनखेडाचे ग्रामसेवक बिराजदार साहेब, गांजनखेडचे उपसरपंच राजेंद्र पाटील ,  ह.भ.प. किशोर पाटील औसा वारकरी सांप्रदाय तालुका अध्यक्ष, तपसे चिंचोली ग्रामपंचायतीचे सदस्य  पद्माकर तोर,  माजी सरपंच हरिभाऊ ढेकणे , सतीश पाटील , ओम पाटील, विकास भरती , शरद पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक  आदी मान्यवर उपस्थित होते.  तसेच या कार्यक्रमात एसबीआय फाऊंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर के. मंजुळा मॅडम प्रेसिडेंट निक्सन जोसेफ, CGM महाराष्ट्र दिलासाच्या उपाध्यक्षा वैशाली खाडिलकर यांनी ऑनलाईन संवाद साधला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल घुळे  यांनी केले तर आभार प्रदर्शन  पद्माकर तोर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या