अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व पिककर्जाच्या फाईली तात्काळ मंजूर करण्याचे आदेश द्या

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व पिककर्जाच्या फाईली तात्काळ मंजूर करण्याचे आदेश द्या





औसा प्रतिनिधी


 भारतीय स्टेट बँक शाखा औसा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व पीक कर्जाच्या फाईली तात्काळ मंजूर करण्याचे आदेश द्यावे. या मागणीसाठी मराठा शिव सेवक समिती महाराष्ट्र राज्याचे औसा तालुका अध्यक्ष आकाश प्रकाश पाटील यांनी दिनांक 23 नोव्हेंबर 2020 सोमवार रोजी औसा तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे या निवेदनात असे नमूद केले आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन  अध्यक्ष नरेंद्र पाटील दि.21/08/2019 रोजी औसा तहसील कार्यालय येथे आले असता त्यावेळीचे मॅनेजर जॉय यांनी फाईली तात्काळ मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. तरी  आता दोन वर्ष होऊनही आकाश प्रकाश पाटील (जाधव) , अश्विनी गोपाळ वाघमारे यांच्या फाईली दोन वर्ष झाले तरी आज रोजी प्रलंबित आहेत. तसेच तालुक्यातील शेतक-यांच्या पिक कर्जाच्या फाईलीअशाच प्रकारचे प्रलंबित आहेत. तरी मा.तहसीलदारांनी बँकेला तात्काळ आदेश देवून फाईली मंजूर करण्याचे आदेश द्यावेत.अशी मागणी निवेदनाद्वारे औसा तहसीलदार यांना केली आहे.या निवेदनावर मराठा शिव सेवक समिती महाराष्ट्र राज्याचे औसा तालुका अध्यक्ष आकाश प्रकाश पाटील यांची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या