शाॅर्ट सर्किटने नुकसान झालेल्या ऊसाची आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून पाहाणी.

 शाॅर्ट सर्किटने नुकसान झालेल्या ऊसाची आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून पाहाणी. 



पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे वीज वितरण कंपनीला निर्देश. 




औसा/मुख्तार मणियार

औसा तालुक्यातील मातोळा येथे दिनांक १४ नोव्हेंबर 2020 रोजी शाॅर्ट सर्किट होवून विदयुत तार तुटून ऊसाच्या फडात पडून सुमारे पंधरा एक्करवर ऊस पेटून नुकसान झाले होते. या नुकसानची पाहणी आमदार अभिमन्यू पवार यांनी दि.१५ नोव्हेंबर रोजी केली.व याबाबत पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश त्यांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. 


                             मातोळा ता.औसा येथे शॉर्ट सर्किटमुळे नंदकुमार श्रीहरी आनंदगावकर,संतोष आनंदगावकर, सुनील आनंदगावकर, गणपती भगवान आनंदगावकर, अर्जुन पांडुरंग आनंदगावकर,रमेश आनंदगावकर, सुधाकर हरिदासनाना भोसले आदी शेतकऱ्यांच्या ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे व संबंधित नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी असे निर्देश त्यांनी उपस्थित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी बोलताना विदयुत पुरवठा करणाऱ्या तारा खुप जुन्या व जीर्ण झाल्या आहेत.यामुळे या तारा बदलून नवीन तारा टाकून त्याव्दारे विदयुत पुरवठा करावा अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले. 


            यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोषअप्पा मुक्ता, मातोळा सरपंच बालाजी सूर्यवंशी,चेअरमन मधुकर भोसले, धनंजय भोसले, माजी सरपंच बाळकृष्ण पटवारी,शिवाजी भोसले, संजय कुलकर्णी, रवी भोसले, व्यंकट भोसले, सुनील आनंदगावकर, संतोष आनंदगावकर,आण्णासाहेब आनंदगावकर,बाबासाहेब आनंदगावकर,अमोल आनंदगावकर,काशीनाथ आनंदगावकर, निशांत भोसले, दत्ता भोसले आदीसह शेतकरी उपस्थित होते.... .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या