अनाथ आश्रमांच्या मुलांना पुस्तक दान व वृक्षारोपन करून डी.टी.आंबेगावे यांचा वाढदिवस साजरा.*

 *अनाथ आश्रमांच्या मुलांना पुस्तक दान व वृक्षारोपन करून डी.टी.आंबेगावे यांचा वाढदिवस साजरा.* 







लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांचा एस.ओ.एस.बालग्राम (अनाथ आश्रम)लातूर येथे मुलांना पुस्तक दान व लातूर शहरात वृक्षारोपन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. मुलांना भारतीय संविधानांची ओळख व्हावी, समाजसुधारक, महापुरूष, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू यांचे जीवन व कार्य समजावे, वाचन संस्कृती वाढावी, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, शब्दसंग्रस वाढावा, लोकांशी प्रभावी संवाद साधता यावा, स्मृती आणि विचार विकसित व्हावे, मुलांवरील ताण कमी व्हावा, सर्जनशीलता व एकाग्रता वाढीस लागावी, नवनवीन गोष्टींची माहिती मिळावी, मुलांमध्ये वाचनांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने डी.टी.आंबेगावे यांनी जुण्या रूढीपरंपरेच्या वाढदिवसाला कलाटणी देऊन पुस्तक दान व वृक्षारोपन करण्याचे अभियान हाती घेतले आहे. तसेच ग्रीन लातूर वृक्ष टीमचे प्रमुख डाॅ.लड्डा व त्यांची संपूर्ण टीम यांच्या उपस्थितीत सकाळी ८.०० वा. लातूर रिंग रोडवरील वृक्षांसोबत तर राजस्थान शाळेसमोर वृक्षारोपन करून वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे, अजयभाऊ सुर्यवंशी, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, मराठवाड अध्यक्ष विष्णू आष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहु शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, विधी सल्लागार अॅड.जितेंद्र पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन भाले, जिल्हा समन्वयक सुनिल बरूरे, युवाध्यक्ष सुनिल कांबळे, पत्रकार श्रीकांत चलवाड, एस.ओ.एस. बालग्रामचे संचालक मिरा सिंग, को वर्कर्स सुजय बाजपेयी व मुले उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्यांने संघाच्या भंडारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्याना पुस्तक दान करून हे अभियान यशस्वी करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या