[नगर परिषद औसा शॉपिंग कॉम्प्लेक्स चे लिलाव ऑनलाईन पद्धत रद्द करून अॉफ लाईन पध्दतीने करावी:-एम आय एम पक्षाची मागणी
औसा मुख्तार मणियार
नगर परिषद औसा शॉपिंग कॉम्प्लेक्स चे लिलाव ऑफलाइन पद्धतीने घ्या व तसेच जाचक अटी रद्द करून एक अनामत रकमेवर सर्व लिलावात भाग घेण्यासाठी तरतुद करणे व शहराच्या नागरिकांना गाळे घेण्यासाठी प्राधान्य द्यावे या मागणीसाठी औसा येथे एम आय एम पक्षाच्यावतीने नगरपालिका चे मुख्याधिकारी व लातूरचे जिल्हाधिकारी यांना 10 नोव्हेंबर 2020 मंगळवार रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात औसा येथील नगर परिषद औसा शॉपिंग कॉम्प्लेक्स चे ऑनलाईन लिलाव अर्ज करण्याचे जाहीर केले आहे. परंतु औसा शहरातील जनतेस ऑनलाईन पद्धत हाताळण्याची पूर्ण माहिती नसल्याने ऑनलाईन नोंदणी करणेस व लिलावामध्ये भाग घेणेस अडचण निर्माण होत आहे, तसेच सदर लिलावामध्ये नोंदणी प्रत्येक गाळासाठीची वेगळी नोंदणीची फी ची अट, तसेच एका अनामात रकमेवर एक दुकानाच्या लिलावामध्ये भाग घेण्याची अट रद्द करावी. कारण मागील महिन्यापासून लाॅकडाऊन असल्यामुळे शहरातील नागरिकांकडे तुटपुंजी भागभांडवल आहे. प्रत्येक गाळासाठी वेगळी नोंदणी फी, अनामत रक्कम भरणा करणे शक्य नाही याकरिता मुख्य अधिकाऱ्यांनी नगर परिषद शॉपिंग कंपलेक्स लिलावा मध्ये नोंदणी प्रत्येक गाळासाठी ची वेगळी नोंदणी फी ची अट तसेच एका अनामत रकमेवर एका दुकानाच्या लिलावामध्ये भाग घेण्याची अट व ऑनलाईन पद्धत रद्द करावी. त्याऐवजी ऑफलाइन लिलाव, एक नोंदणी सर्व गाळाचे लिलावात भाग घेण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून सर्व औसा शहरातील जनतेस सदर नगरपरिषद गाळा लिलावात समान हक्काने भाग घेता येईल व नगरपालिका औसा शहरातील नागरिकांच्या हितासाठी स्थापना झालेली आहे. तरी औसा शहरातील जनतेला व्यवसाय करण्यासाठी शहराच्याच नागरिकांना दुकाने देण्यात यावी. असे निवेदनात नमूद केले आहे. या मागणीचे निवेदन एम आय एम पक्षाचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, एम आय एम चे सीनियर नेते गफुरूल्ला हाश्मी यांनी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी व लातूरचे जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निवेदनावर या दोघांची सही आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.