अलिशेर कुरेशी यांची प्रभारी नगराध्यक्ष पदी निवड

 अलिशेर कुरेशी यांची प्रभारी नगराध्यक्ष पदी निवड








औसा मुख्तार मणियार

औसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अफसर शेख हे वैयक्तिक कामानिमित्त रजेवर गेल्याने यांच्या जागी उपनगराध्यक्ष अलिशेर कुरेशी यांना प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर रजेचा अर्ज दिल्यानंतर पदभाराची प्रक्रिया पूर्ण झाली. डॉक्टर अफसर शेख जनतेतून निवडून आल्याने पाच वर्ष कायम अध्यक्ष असताना त्यांची कायदेशीररीत्या वैयक्तिक कामानिमित्त रजेवर जाऊन औसा पालिकेच्या माध्यमातून राज्यात इतिहास घडवला आहे. गुरुवारी दिनांक 5 नोव्हेंबर 2020 रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख रजेवर गेल्याने औशाच्या प्रभारी नगराध्यक्ष पदाचा कारभार उपनगराध्यक्ष अलिशेर कुरेशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. औसा नगरपालिकेवर एक हाती सत्ता प्रस्थापित केल्यावर लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर शेख यांनी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची संधी सर्व समाजाला देण्यात येईल आणि स्वीकृत नगरसेवक पदावर शहरातील मागास समाजाला प्राधान्य देण्याचे घोषित केले होते. डॉक्टर अफसर शेख यांनी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत चार नगरसेवकांना प्रभारी नगराध्यक्षपद दिले आहेत.त्याप्रमाणे भरत सूर्यवंशी यांच्या रूपाने प्रथम मराठा आणि आता अलिशेर कुरेशीच्या रूपाने कुरेशी समाजाला इतिहासात प्रथम नगराध्यक्षपद मिळाल्याने त्या समाजात आनंदाचे वातावरण आहे. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष अलिशेर कुरेशी यांचा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकासह पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष जावेद शेख, मेहराज शेख, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव,स्वच्छता सभापती मुजाहिद शेख, नगरसेवक कीर्ती बाई कांबळे, साजिद काजी, रुपेश दुधनकर, अविनाश टिके, कृष्णा सावळकर आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या