"मनरेगातून ग्रामविकास" साधणार्या औसा पॅटर्नला प्रशासकीय अनुष्ठान; प्रस्ताव मंजूरींना गती मिळेल आणि शेतकरी बांधवांना एकाच वेळी अनेक लाभ मिळतील.
औसा मुख्तार मणियार
१३ आॅक्टोबर २०२० रोजी लातूरचे जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत, लातूर जि. प. अध्यक्ष श्री राहुल केंद्रे व सीईओ श्री अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत "मनरेगातून ग्रामविकास" या विषयावर मी मतदारसंघातील प्रशासनासह जि प सदस्य, पं स सदस्य, सरपंच आदींसाठी लातूरचे जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत व लातूर जि. प. सीईओ श्री अभिनव गोयल १ कार्यशाळा आयोजित केलेली. कुशल अकुशल ची ४०-६०% ची अट मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीत अडचणीचे ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर एकपेक्षा अधिक लाभांचे एकत्रित पॅकेजिंग करत मनरेगातून ग्रामविकासाच्या औसा पॅटर्नची संकल्पना मांडलेली. या पॅटर्न अंतर्गत जनावरांसाठी गोठा/ शेळीपालनासाठी शेड/ कुक्कुटपालनासाठी शेड बांधण्यासोबत शेततळे निर्मिती, बांधावर वृक्ष लागवड, फळबाग लागवड आदींचे लाभ शेतकऱ्यांना दिले जातील. म्हणजे ४०-६०% च्या अटीचे पालनही होईल आणि शेतकऱ्यांना एकपेक्षा अधिक लाभही मिळतील.
माझ्या मतदारसंघात हा पॅटर्न राबविताना या संकल्पनेचा लाभ संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मिळावे यासाठी प्रयत्न चालू होते. आज त्या प्रयत्नांना यश लाभले असून मनरेगाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पॅकेजेस च्या माध्यमातून लाभ देण्यासाठी लातूरचे जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत यांनी परिपत्रक काढले आहेत. यामुळे आता मनरेगाअंतर्गत प्रस्ताव मंजूरींना गती मिळेल आणि शेतकरी बांधवांना एकाच वेळी अनेक लाभ मिळतील.
लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या पॅटर्नचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.