क्षत्रिय मराठा समाजाच्या लातूर जिल्हा प्रमुख पदी गणेश भाऊ माडजे पाटील यांची नियुक्ती

 क्षत्रिय मराठा समाजाच्या लातूर जिल्हा प्रमुख पदी गणेश भाऊ माडजे पाटील यांची नियुक्ती






औसा मुख्तार मणियार


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा.जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ माडजे यांच्यावर आजुन एका जिम्मेदारीची भर पडली आहे .. क्षेत्रिय मराठा समाजाच्या जिल्हा प्रमुख पदी त्याची निवड करण्यात आली आहे .या नियुक्ती मध्ये स्वराज्य संस्थापक राजमाता जिजाऊ, माॅसाहेब महाबळी छत्रपती शहाजीराजे, यांच्या आशीर्वादाने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी करण्याच्या हेतूने, आपल्या सामाजिक कार्याची व संघटनात्मक कार्यशैलीची दखल घेऊन गणेश माडजे पाटील यांची क्षत्रिय मराठा कार्य करणीच्या लातूर जिल्हा प्रमुख या पदावर दि.29 ऑक्टोंबर 2020रोजी नियुक्ती करायचे ठरविले आहे. आपले नियुक्ती पत्र क्षत्रिय मराठा प्रदेश प्रमुख प्राध्यापक विजय मोहिते यांच्या हस्ते नियोजित महाराष्ट्र दौर्‍याच्या वेळेस दिले जाईल. असे पत्रात नमूद केले आहे.आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्रात क्षत्रिय मराठा संघटन जोमाने वाढेल, तसेच जास्तीत जास्त संख्येने बांधव ग्रुपला जोडले तसेच मराठा समाजाचे आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक, व्यवसायिक उत्कर्ष होईल यासाठी कार्यरत व्हायचे आहे प्रदेश प्रमुख यांनी न्याय  हाक्का साठी लढणाऱ्या व्यक्ती मत्व कडे मराठा समाजाच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवल्या मुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या