संत शिरोमणी मारुती साखर कारखाना सुरू करु
श्री शैल्य उटगे यांची पत्रकार परिषदेत माहिती
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती साखर कारखाना 20 डिसेंबर अखेरपर्यंत सुरू करू अशी माहिती दिनांक 5 नोव्हेंबर 2020 गुरुवार रोजी औसा येथे आयोजित पत्रकार परिषदेत संचालक तथा मांजरा कारखान्याचे चेअरमन तथा काँग्रेसचे लातूर जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी दिली. या पत्रकार परिषदेमध्ये संबोधित करताना ते पुढे म्हणाले राज्यातील 32 साखर कारखान्यांपैकी अधिक कर्ज असणारा मारुती महाराज साखर कारखाना बँक हमीस आणण्यात यश आले आहे. सुरक्षा कायदान्यने हा साखर कारखाना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जप्त केला होता .आता जिल्हा बँकेने सात कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याची हमी दिल्याने आर्थिक अडचणीवर करता येईल, नऊ वर्षात पुनरंचित कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. मांजरा परिवाराच्या धर्तीवरच हा कारखाना चालविला जाणार असून तालुक्यातील चार लाख 80 हजार मेट्रिक टन उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. हा कारखाना 20 डिसेंबर 2020 पर्यंत सुरू करण्याची संपूर्ण तयारी संचालक मंडळाने केली असून तज्ञ कर्मचारी व अधिकारी नियुक्त करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील महा विकास आघाडीने संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याला विशेष नियमात बसवून एक कोटीच्या कर्जासाठी थक हमी दिली आहे. सहा वर्ष सतत बंद असलेला हा कारखाना लवकरच सुरू होईल अशी माहिती या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत संचालक श्रीशैल उटगे, चेअरमन गणपती बाजुळगे, व्हाईस चेअरमन श्याम भोसले, संचालक अनिल माने, सचिन पाटील, विलास शिंदे, सुरेश भुरे, अनिल झिरमिरे, हरिश्चंद्र यादव, शामराव साळुंखे, सुरेश पवार, हनुमंत माळी, गितेश शिंदे, प्रदीप चव्हाण, अर्चना भोसले, स्नेहल जगताप आदी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.