खुंदमिर मुल्ला सामाजिक कार्यकर्ते औसा यांच्यासह इतरावर आकस बुद्धी दाखल केलेले गुन्हे रद्द करा:- मोमीन समाज युवा मंच औसा यांची मागणी
औसा मुख्तार मणियार
औसा येथील सामाजिक कार्यकर्ते खुंदमिर मुल्ला व इतर नावे मजहर शेख, शहानवाज पटेल, बाबा पटेल यांनी सोशल डिस्टंसिंग व कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्या इस्लाम विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ निवेदने केली होती. सदरील सामाजिक कार्यकर्त्यावर कार्यक्रम covid-19 चे नियम पुढे करून त्यांच्यावर आकाश बुद्धीने औसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना मे. साहेबांनी निपक्ष पणे न्याय द्यावा व या संबंधित प्रकरणाची उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती मार्फत चौकशी करून संबंधित एफ आय आर रद्द करण्याचे आदेश देऊन सहकार्य करावे अशी मागणीचे निवेदन दिनांक 5 नोव्हेंबर 2020 गुरुवार रोजी औसा तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना मोमीन समाज युवा मंच च्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनावर मोमीन समाज युवा मंच औसाचे एस आर हन्नुरे, न्यामत लोहारे, महंमद मुंगले, खुंदमिर तत्तापुरे, एडवोकेट इमरान ऊजलूमवाले आदिच्या स्वाक्ष-या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.