बंजारा समाज धर्मगुरु स्व. रामरावजी महाराज यांना वसंतराव नाईक चौकात विनम्र अभिवादन

 *बंजारा समाज धर्मगुरु स्व. रामरावजी महाराज यांना वसंतराव नाईक चौकात विनम्र अभिवादन* 





( जिल्हा प्रतिनिधी )

लातुर : दि. २ - लातुर महानगरपालिका क्षेत्रातील आणि प्रभाग क्रमांक १५, १६, १७ या भागाचे केंद्रस्थान असलेल्या कै. वंसतराव नाईक चौक रिंग रोड येथे भारतीय जनता पार्टी व बंजारा समाजाच्या  वतीने बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांचे वंशज जगदगुरु स्व.श्री. रामरावजी महाराज यांच्या प्रतिमेस भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, मंडल अध्यक्षा शोभाताई पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा लातुर भाजपाचे ज्येष्ठ नेते व्‍यंकटराव पनाळे, संध्या जैन भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पन करुन विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली. यावेळी लातूर शहर जिल्हा सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, संजय गिरी, सुरेश राठोड, वामन राठोड, प्रदिप मोरे, ॲड. निलेश करमुडी, नितीन शेट्टे, संजयकुमार सुरवसे, दिलीप धोत्रे, राजेंद्र वनारसे, देवा गडदे, महादेव कानबुले, एपिआय संजय पवार, राठोड साहेब, बाळासाहेब भोसले, व्यकंटेश कुलकर्णी, गणेश राठोड, नंदु पवार, राम पवार, भाऊराव राठोड, श्रावण राठोड, दिलीप राठोड, प्रल्हाद चव्हाण , सुनिल पाचंगे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या