प्रत्येकांनी समतेचा विचार पेरावा-सौ. सारिका राऊत
औसा मुख्तार मणियार
औसा येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने 28 व्या समता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजन सुधाकर माळी यांनी covid-19 च्या शासन नियमाचे पालन करून प्रातिनिधिक स्वरूपात समतेच्या विचारांची पेरणी व्हावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक एन जी माळी होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ सारिका राऊत होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक कोकणी होते. सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 28 व्या समता दिनाचे संस्थापकीय अध्यक्ष विद्यमान मंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ यांनी समता दिनाची स्थापना का केली? त्याचा उद्देश काय आहे व मानव कल्याणकारी जीवनात संत -महतांचे विचार काय आहेत या विषयावर विचारांची पेरणी करताना सौ सारिका राऊत यांनी उपस्थितांना प्रत्येकानी समतेचा विचार पेरावा असा संदेश दिला.
या कार्यक्रमास 15 प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांचे समता परिषदेचे तालुका अध्यक्ष यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यामध्ये उमाताई म्हेत्रे शहराध्यक्ष महिला आघाडी, भाई चर बसप्पा केवळ राम गुरुजी, पंचायत समिती सदस्य नवनाथ राऊत, अर्जुन माळी, सौ सारिका राऊत, विनोद माळी, राम कृष्णा लोखंडे, बंडू मेत्रे, जालिंदर राऊत, आदी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी प्राध्यापक एन जी माळी, प्राध्यापक कोकणे सर, भाई चनबसप्पा केवळराम गुरुजी यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमातून समाजाच्या प्रगतीसाठी समाजाचा सर्वे करावा असा सूर निघाला. या सूचनेचे स्वागत करून मासुरडीचे पंचायत समिती सदस्य नवनाथ यांनी तन-मन-धनाने मदतीचा हात पुढे केला व माळी समाजातील मान्यवरांना सर्वे करताना मदतीचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते किसन कोलते यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष सुधाकरराव माळी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश तेलंग, रविकांत खुरपे, मोहन बोधने, गोपाळ माळी, सौ मीरा कठारे आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.