जाफर पटेल युवा मंचचा रक्तदान शिबिर सम्पन्न
औसा आज दिं.०१/११/२०२० वार रविवार रोजी प्रेषीत_मुहम्मद_पैगंबर यांच्या जयंतीचे(ईद-ए-मिलादुन्नबी) औचित्य साधुन जाफर पटेल युवामंच च्या वतिने भव्य "#रक्तदान_शिबीराचे" आयोजन कटघर गल्ली शादीखाना येथे पार पडले. आजच्या या धावपळीच्या युगात तरुण मंडळी वेगवेगळ्या व्यसनामध्ये गुरफटलेली असताना "जाफर पटेल युवा मंच" च्या नवतरुण कार्यकर्त्यांनी प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जंयती निमीत्त घेतलेल्या या रक्तदान शिबीराचे कौतुक करावे तितके कमी आहेत. प्रेषित मुहम्मद पैगंबर हे सर्वांसाठी मानवतेचे धडे देण्यासाठी ६ व्या शतकात इश्वर यांच्या कडुन अवतरलेले एक महान व्यक्तिमत्त्व त्याकाळी मानवी मुल्यांचे होत असलेले दमन रोकण्यासाठि प्रेषित यांनी आपल्या उपदेशांच्या मार्फत ईशवानी लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले १४०० वर्ष लोटुन सुद्धा आजपावेतो त्यांची महती कमी झालेली नाही असे प्रतिपादन प्रास्ताविकात पठाण_समीरखान _सर यांनी आपले विचार मांडले. या शिबीराचे उदघाटक *मा.श्रीशैल्य दादा उटगे( अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, लातुर) यांनी कोरोना च्या काळात रक्तदान किती महत्वाचे व गरजेचे आहे याची माहीती दिली. *मा. संतोषभाऊ सोमवंशी(शिवसेना संपर्क प्रमुख,लातुर)*यांनी महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी या कार्यांत सहभागी होवुन कोरोना सारख्या महामारीला सर्वच स्तरातुन पराभुत करुत अशी आशा व्यक्त केली. *मा.विवेक मिश्रा(काँग्रेस कार्यकर्ते)यांनी नवतरुण कार्यकर्त्यांनी आता पुढे होवुन समाजात जनजाग्रती करण्याबरोबरच राजकारणात सक्रिय होण्याची गरज आहे असे विधान केले व जाफर पटेल युवा मंच च्या सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी अध्यक्षीय समारोपात मा. *डाॅ_अफसर_शॆख* (लोकनियुक्त नगराध्यक्ष,औसा) यांनी आपले कुटुंब,आपली जबाबदारी च्या अनुषंगाने कोरोना-१९ चा दुसरा टप्पा दुसर्या राष्ट्रात सुरु होत आहे. सर्वांनी सोशल डिस्टसींग,मास्क,सॅनिटायझर चे वापर करावे गाफिल राहु नये व वेळोवेळी प्रशासनास सहकार्य करावे असे अवाहन जमलेल्या नागरिकांना व कार्यकर्तांना केले. आभार आदर्श नेता चे संपादक जाफर पटेल यांनी मानले सुत्रसंचलन पठाण समीरखान सर यांनी केले. आजच्या या रक्तदान शिबीरास नागरिकांतुन व कार्यकर्त्यातुन चांगला प्रतिसाद मिळाला जवळपास 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विषेश बाब म्हणजे महाविकास आघाडी तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष मंचावर उपस्थित होते. या शिबीरास डाॅ.आर.आर.शेख (तालुका अरोग्य अधिकारी,औसा),तानाजी_चव्हाण(मुख्याधिकारी न.प.,औसा) एन.बी.ठाकुर (पोलिस निरीक्षक,औसा) मुजाहेद शॆख (आरोग्य स्वच्छता सभापती न.प.औसा), गोविंद जाधव(पाणीपुरवठा सभापती न.प.औसा), शेख शकील अण्णा (शहराध्यक्ष काँग्रेस पार्टी औसा) शाम भोसले (व्हा चेअरमन , मारुती महाराज साखर कारखाना ) शेख अफसर(शहराध्यक्ष एम.आय.एम.) रोहित गोमदे (शिवसेना नेते,औसा) अविनाश टिके, अहेमद पटेल,जयराज ठाकुर , मोहसिन पटेल , फिरोज पटेल, मुजाहेद पटेल, पाशा शेख, खादर शेख, विशाल मोरवाळ, अ हक्क शेख यांची उपस्थिती होती. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरीता फारूक शेख, जाफर पटेल, जाकेर पटेल ,मुन्ना देशमुख, इखलास काझी, शैलेश हंडे, हरीश महामुनि , रघुराज ठाकुर, अर्शद शेख, सद्दाम शेख,पत्रकार पाशा शेख, मजहर पटेल, साहिल पटेल, अज़हर पटेल, मज़हर शेख, मोहित शेख, समिर शेख, बिलाल शेख, उमर सय्यद , अज़हर शेख, साबेर पटेल, दस्तगीर शेख, अखिल शेख, आसिफ शेख, मुशीर शेख यांनी परिश्रम घेतले आभार जाफर पटेल यांनी मानले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.