औसा नगर परिषद सभागृहाचे नूतनीकरण व विस्तारीकरण त्वरित करा: एम आय एम व सामाजिक कार्यकर्ते औसा यांची मागणी

 औसा नगर परिषद सभागृहाचे नूतनीकरण व विस्तारीकरण त्वरित करा: एम आय एम व सामाजिक कार्यकर्ते औसा यांची मागणी




औसा:गोर गरीब अल्पसंख्यक, मागासवर्गीयासाठी सोयी (सोईस्कर ) असलेले औसा नगर परिषद सभागृहचे नुतनीकरण व विस्तारीकरण त्वरीत करा या मागणीचे निवेदन दिनांक 18 नोव्हेंबर 2020 बुधवार रोजी नगर परिषद चे मुख्य अधिकारी यांना एम आय एम औसाचे प्रमुख नेते सय्यद मुजफ्फर अली इनामदार व सामाजिक कार्यकर्ते खुंदमीर मुल्ला, अभयसिंग भिशेन, माजिद भाई काझी यांच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे. औसा शहरातील मोक्याच्या ठिकाणी आपल्या मालकीचे नगर परिषद संस्कृतीक सभागृहची सध्या दैनिय अवस्था झालेली आहे व सदरील संस्कृतीक सभागृहाच्या विस्तारीकरण व पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर न.प.च कडून दुसरे बांधकामचे काम होत असताना दिसत आहे. सदरील मोकळीजागेवर भविष्यात सभागृह मोठा करण्यासाठी राखिव असताना व त्याच कामासाठी कायमस्वरूपी आरक्षित असताना जागेवर इतर बांधकामे होत आहेत हे गंभीर बाब आहे.


औसा शहरात न.प.संस्कृती गृहाच्या कार्यक्रमासाठी नगरपरीषदकडून ना.मात्र भाडे घेऊन न.प.संस्कृत सभागृह मागील अनेक वर्षापासून भाडे तत्वार देण्यात येत आहे. ज्यामुळे औसा शहरातील गोर गरीब, अल्पसंख्यक,मागासर्वीय साठी एक चांगली बाब आहे. न.प.संस्कृत गृहाच्या तुलनेत शहरातील खाजगी सभागृहचे भाडे हजारो रू असल्यामुळे न.प.संस्कृत, सभागृह भविष्यासाठी गोर गरीबांचा विचार लक्षात घेता चालू राहाणे अत्यंत गरजेचे आहे. औसा नगर परिषदकडून शहरात अनेक कोरोडो रूपयचे विकास कामे होत असताना दिसत आहेत पण गोर गरीबांच्या जिव्हाळयाच्या असलेल्या न.प.सभागृहाच्या नुतणीकरण व विस्तारीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे किंवा हे संस्कृती सभागृह बंद पाडणयाचा षडयंत्र तर होत नाही ना? अशी औसा शहरवासियांची भावना झालीले आहे.


तरी मे.साहेबांनी पुढच्या महिन्यापासून चालू होणाऱ्या लग्न सराईचा विचार करून त्वरील या औसेकरांच्या लक्ष देवून मागणी मान्य करून खास करून अल्पसंख्याक व मागासवर्गीयांना न्याय देण्याचा काम करावे. अशी मागणी चे निवेदन औसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले या निवेदनावर एम आय एम पक्षाचे प्रमुख नेते सय्यद मुजफ्फर इनामदार, व सामाजिक कार्यकर्ते खुंदमीर मुल्ला, अभयसिंग भिशेन, माजिद भाई काझी यांची स्वाक्षरी आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या