आमदारांनी उघडले निळकंठेश्वराचे दार.. आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून किल्लारी व नागरसोगा मंदिरात पुजा.

 आमदारांनी उघडले निळकंठेश्वराचे दार.. 





आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून किल्लारी व नागरसोगा मंदिरात पुजा. 








औसा - लाॅक डाऊन नंतर तब्बल आठ महिने बंद असलेले राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात आली धार्मिक स्थळे उघडण्यासाठी भाजप पक्षाने विविध माध्यमांतून आंदोलन केले होते. अखेर सरकारला उशिरा का होईना जाग आली आणि भाविक भक्तांसाठी मंदिरांची दारे आज उघडण्यात आली. या अनुषंगाने आमदार अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघातील किल्लारी येथील जागृत देवस्थान निळकंठेश्वराचे दि.१७ नोव्हेंबरला पहाटे अभिषेक करुन दर्शन घेतले. 



                  लाॅक डाऊननंतर आठ महिने बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात आली.देशभरातील इतर राज्यात या अगोदरच धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली असताना सुद्धा राज्यात मात्र हि धार्मिक स्थळे बंद होती.राज्यातील मद्य विक्रीची दुकाने सरकारने खुली केली असता धार्मिक स्थळे मात्र कुलुपबंद ठेवल्याने राज्य सरकारवर चौफेर टीका केली जात होती. कोव्हीड च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करित धार्मिक स्थळे भाविकांनी खुली करावी या मागणीसाठी भाजपने राज्यभर घंटानाद आंदोलन केले होते.अखेर उशिरा का होईना सरकारला जाग आली व धार्मिक स्थळे उघडण्यात आली.यानंतर सोमवारी आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारी येथील जागृत ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरात अभिषेक केले व कोरोना चे संकट लवकरात लवकर पूर्णपणे दूर होऊन सर्वांचेच जीवन पूर्वपदावर येऊ देत आणि शेतकऱ्यांना भरभराटीचे दिवस येऊ देत असे साकडे त्यांनी निळकंठेश्वराला घातले.याचबरोबर नागरसोगा येथील खंडोबा मंदिर कलशारोहण बांधकामाचे भूमिपूजन यावेळी आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते झाले. 









      यावेळी जि.प.चे सदस्य महेश पाटील, संतोष मुक्ता, पं. स. सदस्य दीपक चाबुकस्वार, जयपाल भोसले,विलास सगर, अशोक गावकरे, संदिप शिवणीचारी, निळकंठश्वर देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी भोसले, खंडोबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब बेडगे, बाबुदादा दवटे, सुग्रीव मुदगडे,  उत्तमराव सुर्यवंशी, यशवंत सुर्यवंशी, दिलीप सुर्यवंशी व भाविक उपस्थित होते!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या