बारशाने वाजविले कुटुंबाचे बारा,
पोरं झाली आईच्या आधारापासून पोरखी
औसा मुख्तार मणियार
औसा :भूमिहिन शेतमजूर असणाऱ्या कुंडलिक बब्रुवान हजारे या मजुराने काम केले तरच चुल पेटत होती अशी परस्थिती असणारा या मुलांचा वडील कुंडलिक हा सालगडी म्हणुन कामाला असायचा तो सात वर्षांपूर्वी अकाली मृत्यू पावला तर काही दिवसांनी कुंडलीकचे वडील बब्रुवान भीमा हजारे तरीही स्वाती आणि विशाल या दोन मुलांची आई सुवर्णा ही मजुरी करुन संसाराचा गाडा जिद्दीने चालवत मुलांना शिकविण्याचे स्वप्न उराशी बाळगुन राबनारी आईही दि 15 नोव्हेम्बर 2020 रोजी दुपारी 1 वाजता ऐन दिवाळीत झालेल्या अपघातात सुवर्णाचा मृत्यू झाल्याने ती मुलांना सोडून गेली.यामुळे खेळण्या बागडण्याच्या दिवसांत अनाथ झालेल्या मुलांना जगण्यासाठी काय करावे लागते हेही माहीत नाही.वडीलांनतर आईचेही छत्र हिरावणाऱ्या नियतीला भादा गावातील दोन अनाथ मुले प्रश्न विचारत आहेत की 'नियती तुच सांग यात आमचा काय गुन्हा'? पुढे शिक्षण पूर्ण करायचे की,जगण्याचा पर्याय शोधायचा हा यक्ष प्रश्न भाद्याच्या स्वाती कुंडलीक हजारे (वय17) व तिचा भाऊ विशाल हजारे(15वर्ष) यांना पडला आहे.
सालगडी म्हणुन काम करणाऱ्या कुंडलीक हजारे व सुवर्णा यांना एक मुलगी स्वाती आणि मुलगा विशाल ही दोन अपत्ये आहेत.सात वर्षांपुर्वी कुंडलीक हजारे यांचे निधन झाले.दोन्ही मुलांना आपल्या पंखाखाली घेत सुवर्णा हजारे यांनी मोलमजुरी करुन मुलांना शाळेत घातले. शासनाकडून निराधार योजनेचे मिळणारे मानधन आणि दिवसभर शेतात राबुन मिळणारी मजुरी यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.सध्या मुलगी स्वाती ही संत ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय लासोना (जि.उस्मानाबाद) येथे बारावीत शिकते,तर मुलगा विशाल हा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीला आहे.नरकचतुर्थी दिवशी सुवर्णा हजारे या समुद्रवाणी येथील भावाकडे भावाच्या मुलाच्या बारशाला जात होत्या.यातच हि दुर्दैवी घटना घडली.यामुळे संपूर्ण भादा सह परिसरात दुःखाच्या छायेत दि 16 नोव्हेम्बर 2020 रोजी अंत्यविधी झाला यामुळे परिसरावर शोककळा पसरली होती
.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.