ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले ; गावकारभारी निवडीसाठी 15 जानेवारीला मतदान....
औसा प्रतिनिधी/- राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून गाव कारभारी निवडण्यासाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दि. 14 /12/ 2020 च्या अर्हता यादीनुसार मतदान प्रक्रिया घेण्यात येणार असल्याचे कळते मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित पित झालेल्या एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात येणार असून औसा तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. सदर निवडणुका विहित मुदतीत पार पाडण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत आचारसहिता लागू राहणार असून या क्षेत्रात विपरीत प्रभाव टाकणारी कोणती घोषणा किंवा कृती संबंधितांना करता येणार नाही. संगणक प्रणालीद्वारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे लागणार आहे. निवडणुका पार पाडताना covid-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य सेतू ॲप नियमांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम शासनाच्या www.mahasec.maharashtragob.in या डॉट संकेत स्थळावर उपलब्ध केला असल्याची माहिती किरण कुरुंदकर सचिव राजा निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दिन. 11 12 2020 च्या परिपत्रकां वे कळविले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.