मत्स्य व्यवसायासाठी तलाव ठेका भरून घेण्यास टाळाटाळ
औसा प्रतिनिधी.... जिल्ह्यातील पाझर तलावांमध्ये असलेल्या मासेमारीसाठी अधिक्रत ठराविक रक्कम भरून घेऊन दिला जातो. पाजर तलाव अंतर्गत मासेमारीसाठी तलाव ठेका देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने मत्सव्यवसाइक व संस्थाचालकांची गैरसोय होत आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या तांत्रिक अडचणीचे कारण देऊन रक्कम भरून तलाव ठेका देण्यासाठी संबंधित अधिकारी असमर्थता दर्शवित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मत्स्य व्यावसायिक संस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे .या वर्षी समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पाझर तलावात मुबलक पाणीसाठा असल्याने व मत्स्यबीज सोडल्याने मत्स्य निर्मितीही झाली आहे. मत्स्यव्यवसाय संस्थांना रक्कम भरून अधिकृत तलाव ठेका दिल्यास व्यवसायिकांना रोजगार व शासनाला महसूल मिळू शकतो .औसा तालुक्यातील शिंदाळावाडी येथील पाझर तलावाची जिल्ह्याच्या यादीत क्रमांक-15व येलोरी क्रमांक 8 मध्ये तलाव ठेका देण्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आले असताना औसा तालुक्यातील अधिकारी आमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध नाही असे सांगत आहेत .तसेच रीतसर रक्कम भरून घेऊनही मत्स्य व्यवसायासाठी अधिकृत तलाव ठेका देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार रहीम महमूद सय्यद चेअरमन जनता मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था टेंभी ता., औसा यांनी जिल्हाधिकारी लातूर ,उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे औसा ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.