बायो गोल्ड सेंद्रिय खत शेतीला ठरतोय वरदान

 बायो गोल्ड सेंद्रिय खत शेतीला ठरतोय वरदान






     औसा.प्रतिनिधी


 वाढती महागाई आणि मजुराचे वाढते दर लक्षात घेता शेतामध्ये उत्पन्न खर्च वाढत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत. वाढत्या महागाईला तोंड देऊन किफायतशीर खर्चात शेती करताना सेंद्रिय खत शेतीच वरदान ठरत आहे घटकद्रव्यांपासून नैसर्गिक पद्धतीने संप्रेरके तयार करण्यात आली आहेत सूक्ष्म आणि समृद्ध व अनेकांना माहीत नसलेली वनस्पती साठी उपयुक्त जिवाणू वनस्पतीच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याने बायो गोल्ड सेंद्रिय खत शेतीला वरदान ठरत आहे .विविध प्रकारची प्रथिने युक्त संप्रेरके 30 ते 40 टक्के उत्पन्न वाढीस मदत करीत आहेत बायोगोल्ड सेंद्रिय खत द्रव्ययुक्त पदार्थात 1लिटर,5 लिटर ,20लिटर,200लिटर अशा पद्धतीने कंपनीने उपलब्ध केली आहेत .विविध प्रकारची फळझाडे भाजीपाला फुलशेती,ऊस द्राक्ष व इत्यादी सर्व पिकांची व्यवस्थित वाढ होऊन उत्पन्नात भर घालणारे बायो गोल्ड सेंद्रिय खत अनेक शेतकरी अनुभव घेऊन शेतीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ठिबक सिंचनाचा वापर करून पिकावर फवारणी करता येते .ठिबक सिंचन असल्यास साध्या पद्धतीने फवारणी करता येते तसेच जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते बायो गोल्ड संप्रेरके बुरशीनाशक कीटकनाशक असल्यामुळे पिकावर कसलाही दुष्परिणाम न होऊ देता पिकाचे संवर्धन करीत असल्याने व अत्यंत कमी खर्चात शेतीला उपयुक्त सेंद्रिय खत मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊन उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरी सध्या सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे दिसून येत आहे शेतीसाठी हे एक वरदान ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या