औशात चोरट्यांचा धुमाकूळ दोन दुकाने व घरे फोडली


 औशात चोरट्यांचा धुमाकूळ दोन दुकाने व घरे फोडली






 औसा प्रतिनिधी


 शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून शहरातील याकतपूर रोड वरील दोन दुकाने तसेच नागराज पेट्रोल पंपा जवळील विक्रम नगर च्या पाठीमागील रो हाऊस मधील दोन घरे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याने शहरात घबराट पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील  मध्य वस्तीमध्ये घरफोडी झाल्याने श्वानपथक आलेली घटना ताजी असतानाच दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी नवीन वस्तीतील दोन घरे व दोन दुकाने  फोडल्याची घटना घडली आहे. याबाबतचे वृत्त असे की ,याकतपूर रोड वरील गायत्री किराणा अँड जनरल स्टोअर्स व दुसऱ्या एका दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील सामान अस्ताव्यस्त करून साहित्य व रोकड पळवली आहे .तर याच रात्री नागराज पेट्रोल पंपाजवळ धनेश्वर बिडवे या सैनिकाच्या व शिध्देश्वर कासेकर  नामक शिक्षकाच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन्ही घरात चोरी केल्याची घटना रविवारी रात्री च्या सुमारास घडली आहे.औसा येथील याकतपुर रोडवरील माधुरी लेडीज वेअर सेंटरमधील कपडे चोरट्यांनी पळवले आहेत .चोरट्यानी शेजारील शेतात काही किरकोळ वस्तू टाकले असल्याचे कळते .किराणा दुकान मालक नवनाथ काळे व माधुरी लेडीज       विअरचे मालक सागर सतीश इंजे यांनी पोलिसांना या घटनेची खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असल्याचे कळते .दोन दिवसांपूर्वी मोरे गल्लीत चोरी झाली.त्यानंतर रविवारी मध्यरात्री दोन दुकाने व दोन  रोहाऊस मध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केल्याने औसा शहरातील पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान निर्माण झाले आहे.शहरातील चोऱ्यांचे प्रमाण पाहता शहरात पोलिसांनी गस्त वाढविणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे. या घटनेची रीतसर तक्रार दिल्यानंतर पोलिस पुढील तपास करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या