राज्यातील मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व संचालक मंडळावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना संधी द्यावी - इनामदार.

 राज्यातील मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व  संचालक मंडळावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना संधी द्यावी - इनामदार... 





एस ए काझी 


औसा प्रतिनिधी/- महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ संपला असून कोव्हिड -19 मुळे निवडणुका लागल्या नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना संचालक मंडळावर काम करण्याची संधी द्यावी असे मागणीचे निवेदन  औसा तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री व सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना औसा एमआयएम  प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी केले आहे. 

 राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर

 महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची सरकार सत्तेत आहे. महाविकास आघाडी सरकारचा पायंडा चालविण्याच्या 

माध्यमातून राज्यातील मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी द्यावे. संधी देत मंडळावर नियुक्ती द्यावी अथवा निवडणुका घ्याव्यात या मागणीचे निवेदन औसा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर औसा एमआयएम प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची सही आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या