प्रभाग क्रमांक पांच व सहामध्ये एक वार्ड एक दिवस विशेष मोहीम ची सुरुवात
औसा मुख्तार मणियार
औसा शहरामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग औशाच्या वतीने प्रशासन आपल्या दारी प्रत्येक ग्राहकाचे तक्रारीचे निवारण प्रभाग क्रमांक पांच व सहामध्ये एक वार्ड एक दिवस विशेष मोहीम ची सुरुवात आज दिनांक २१ डिसेंबर २०२० सोमवार रोजी अबुल कलाम आझाद चौक औसा येथे नगरसेवक मेहराज शेख,व साजीद काझी यांच्या वार्डामध्ये सुरू करण्यात आली. एक वार्ड एक दिवस विशेष मोहीम मध्ये विज बिल दुरुस्ती करणे, ग्राहकांच्या तक्रार निवारण करणे, केबल फ्यूज किटकॅट बदलणे, आर्थिक किंवा करंट येत असेल तर दुरुस्ती करणे व व झुकलेले पोल सरळ करणे, गंजलेले पोर बदलणे, डीपी चे पेटी बदलने या विशेष कामाची मोहीम महावितरणचे कर्मचारी अधिकारी यांनी ढोर गल्ली,खडकपुरा,काझी गल्ली,कालन गल्ली,भोई गल्ली जाऊन पाहणी करून लोकांचीअडचणी जाणून घेऊन त्या कामाची निवारण करु असे यावेळी म्हणाले. यावेळी या कार्यक्रमामध्ये महावितरणचे अधिकारी जाधव सर,सुळसर,जय धुमाळे,लाईनमन सय्यद,शिवरुद्र हुडगे व वार्ड क्रमांक पांच व सहाचे नगरसेवक मेहराज शेख,व साजीद काझी व महावितरणचे कर्मचारी अधिकारी व त्या वार्डातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.