दारूबंदी अधिकारी गणेश बारगजेनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत प्रवेशद्वारास बेकायदेशीर लावलेले कुलूप सार्वजनिक बांधकाम विभागाने तोडले !

 दारूबंदी अधिकारी गणेश बारगजेनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत प्रवेशद्वारास बेकायदेशीर लावलेले कुलूप सार्वजनिक बांधकाम विभागाने तोडले ! 






लातुर : दि. २२ - लातूर शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकाजवळील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातिलल मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आनेक शासकीय कार्यालया साठी जागा देण्यात आलेल्या आहेत. याच प्रशासकीय इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर जिल्हा दारूबंदी अधिकारी कार्यालयासाठी पण जागा देण्यात आलेली आहे. मात्र या कार्यालयाचे प्रमुख जिल्हा दारूबंदी अधिकारी गणेश बारगजे या मस्तवाल अधिकाऱ्याने दारूबंदीची कामे करायचे सोडून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उजव्या बाजूचे प्रवेशद्वाराचे गेट बंद करून चक्क दारूबंदी कार्यालयाचे गोडाऊनच बनवले होते. जप्त केलेल्या मोटारसायकल प्रशासकीय इमारतीच्या आत उभ्या करुन हे प्रवेशद्वारच कुलूप लावून बंद करून टाकले होते. त्यामुळे या इमारतीमधील जिल्हा निबंधक कार्यालय आणी जिल्हा कोषागार कार्यालय येथे येणाऱ्या सर्वसामान्य व वयोवृद्ध नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. जवळपास मागील दोन वर्षापासून बारगजे यांनी हा उच्छाद मांडला होता. बारगजे यांच्या या कृतीमुळे वयोवृद्ध पेन्शन धारकांना जिल्हा कोषागार कार्यालयात येण्यासाठी विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. त्यांची हेळसांड होत असल्यामुळे नागरिकांनी लोकाधिकार चे प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांच्याकडे हे गेट बंद झाले असल्याबाबतची अडचण मांडुन ते पूर्ववत सुरू करावे अशी मागणी केली होती. जिल्हा दारूबंदी अधिकारी गणेश बारगजे यांचेकडे इमारतीच्या प्रवेशद्वाराचे गेट  कुलूप लावून का बंद केले आहे ? याबाबत चौकशी केली तेंव्हा मला काही माहिती नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारा अशी उत्तरे दिली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे गेट दारूबंदी अधिकाऱ्यांनीच बंद केलेले असून त्या कुलपाची चावी दारूबंदी आधिकार्‍याकडेच असल्याचे समजले. तसेच गेटबंद करून वाहने सुध्दा दारुबंदी अधिकाऱ्यांनीच ठेवलेले आहेत असे समजले. तेंव्हा प्रशासकीय इमारतीचे प्रवेशद्वार बेकायदेशीर पणे बंद करणाऱ्या दारूबंदी अधिकारी गणेश बारगजे यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही करून हे प्रवेशद्वार तात्काळ खुले करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार लोकाधिकार चे प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करुन त्याचा सतत पाठपुरावा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने दारूबंदी अधिकारी गणेश बारगजे यांना दोन वेळेस लेखी कळवूनही बारगजे गेटला लावलेल्या कुलपाची चावी देत नाहीत आणि उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यामुळे अखेर दि. २१ डिसेंबर रोजी बांधकाम विभागाने मस्तवाल दारूबंदी अधिकारी यांनी बेकायदेशीरपणे सर्वजनिक प्रशासकीय इमारती च्या प्रवेशद्वाराला लावलेले कुलूप तोडले आणि सदरचा दरवाजा नागरिकांच्या साठी खुला केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या