प्रभाग क्रमांक तीन व चार मध्ये एक वार्ड एक दिवस विशेष मोहीमाची सुरुवात
औसा मुख्तार मणियार
आज औसा शहरातील प्रभाग 3 व प्रभाग 4 मध्ये महावितरणच्या वतीने 1दिवस 1वार्ड अभियान राबविण्यात आले.हे अभियान गणेश नगर येथील हनुमान मंदिर येथे राबविण्यात आले. यास नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला नागरिकांनी याठिकाणी येऊन लेखी व तोंडी स्वरूपात आपल्या समस्या मांडल्या. नंतर प्रभाग 3 मधील गणेश नगर, समता नगर, लेक्चर कॉलनी, हाश्मी नगर, कादरी नगर, बरकत नगर या भागात तर प्रभाग 4 मधील जमाल नगर, गणेश नगर, नाथ नगर, विठ्ठल नगर, अरिहंत नगर, अन्सार नगर, सारोळा रोड, याकतपुर रोड या भागात जाऊन नागरिकांच्या समस्यांची पाहणी करण्यात आली. या भागातील विविध ठिकाणचे वाकडे झालेले लाईटचे पोल, कुजलेले पोल, लुज पडलेल्या तारा दुरुस्त करण्यासाठी संबंधित अधिकाऱयांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.या दोन्ही प्रभागातून जाणारी धोकादायक 33 KV ची लाईन काढण्याची मागणीही नागरिकांनी केली त्या संदर्भातही महावितरण अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शवली तसेच मेनरोड वरील व लेक्चर कॉलनी मधील लाईट तारा मध्ये येत असलेल्या झाडांच्या फांद्या काढण्यासाठी सांगण्यात आले.यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश जाधव,प्रतिसहाय्यक अभियंता आशिष सुळ,बिलिंग विभागाचे धुमाळ,लाईनमन सय्यद, अजित गाढवे,जामगे,टोंपे इत्यादी तसेच माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक जावेद शेख व पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक गोविंद जाधव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अविनाश टिके रा .वि. कॉ चे वकील इनामदार, माजी नगरसेवक विनायक सूर्यवंशी, बिलाल सिद्दीकी, गजेश्वर शिंदे, कृष्णा सावळकर व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. एक दिवस एक वार्ड या अभियानास अत्यन्त चांगला प्रतिसाद मिळाला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.