आ: अभिमन्यू पवार यांच्या हस्ते गोल्डन डिजिटल चा शुभारंभ औसा प्रतिनिधी
औसा येथील व्यवसायिक पप्पूभाई शेख यांच्या प्रयत्नाने सुरु केलेल्या गोल्डन डिजिटल या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह साकारलेल्या नवीन उपक्रमाचा भव्य शुभारंभ औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न झाला. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आकर्षक डिजिटल बॅनर, साईन बोर्ड ची सुविधा आता जलद गतीने मिळणार आहे. ग्राहकांना आपल्या आकर्षक जाहिराती, डिझाईनची सेवाही मिळणार आहे. या कार्यक्रमास नगराध्यक्ष अफसर शेख, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष, जाधव अमर खानापुरे,प्रा. भीमाशंकर राचट्टे, संतोष अप्पा मुक्ता, हनमंत राचट्टे, शिवकुमार नागराळे, सय्यद मुजफ्फरअली इनामदार, मौ इरफ़ान सौदागर, डॉ जिलानी पटेल,सुनील उटगे यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि व्यवसायिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.या नवीन उपक्रमासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिवरुद्र मुरगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पप्पू शेख कलीम, शेख अलीम, विनय पिंगळे ,बालाजी शिनगारेआदी प्रयत्नशील होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.